news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

दिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर

Ashok Bhoir announce as Handicap district Icon for Divyang voter awareness Ashok Bhoir announce as Handicap district Icon for Divyang voter awareness

 

विधानसभा निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशोक तुकाराम भोईर यांची 'डिस्ट्रिक्ट आयकॉन' म्हणून नेमणूक केली आहे. भोईर यांनी देश पातळीवर दिव्यांग कबड्डी संघात भारताचे प्रतिनिधीत्व केलं असून परदेशात झालेल्या कबड्डी स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. 

(हे ही वाचा -'जावयासारखे राहा, घरजावई कशाला होताय')

कोण आहेत अशोक भोईर

उंबर्डे (ता. कल्याण) येथील रहिवासी असलेले भोईर हे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष आणि संचालक, दिव्यांग जिल्हा नियंत्रण समितीचे सदस्य, नेपाळ येथील पॅरा ऑलिंपिक 2018 चे सुवर्णपदक विजेते असून अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष आहेत. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे म्हणून ते सक्रिय आहेत.

दिव्यांग मतदार महत्वाचा

दिव्यांग व्यक्तींमध्ये मतदानासंबंधी अधिकाधिक जागृती करता यावी, म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भोईर यांची ‘डिस्ट्रीक्ट आयकॉन’ म्हणून नेमणूक केली आहे, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
 
दिव्यांगांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा - भोईर
 
निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन भोईर यांनी केले. लहानपणी पोलिओ झाला होता, परंतु शालेय जीवनात खेळाची प्रचंड आवड होती. सर्वसामान्य मुलासारखं खेळता येत नव्हतं. कबड्डीमध्ये रस असल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना गाईड करणे सुरू होते. पुढे  दिव्यागांच्या संघामध्ये सामील झालो. अनेक स्पर्धा गाजवल्या. राष्ट्रीय संघामध्ये माझी निवड झाली. नेपाळमध्ये झालेल्या 2018 आणि 2019 सलग दोन वर्षे दिव्यांगाचे कबड्डीचे विजेतेपद भारताने मिळवलं. 
 
दिव्यागांना स्वावलंबी करणे हा ध्यास
 
शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यागांना मिळाला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असतो. सरकारच्या अपंग महामंडळ, 5 टक्के नियंत्रण कमिटीच्या सदस्यपदी होतो. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून 200 ते 250 दिव्यागांना रोजगार मिळवून दिला आहे. अपंगांना रोजगार नोकरी मिळाली पाहिजे. यासाठी मी प्रयत्नशील आहेच, परंतु त्यांना स्वावलंबी करणे हा माझा ध्यास आहे.
 
 
Web title – Ashok Bhoir announce as Handicap district Icon for Divyang voter awareness

0 Response(s) to “दिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर”

Leave a reply