news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

संघात येण्याबाबत धोनीच ठरवेल - रवी शास्त्री

M. S. dhoni will decide whether he wants to comeback in the team - ravi shastri M. S. dhoni will decide whether he wants to comeback in the team - ravi shastri

 

क्रिकेटच्या मैदानातून थेट भारताच्या सीमेवर पोहोचलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या वापसीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भारतीय संघात पुन्हा यायचं की नाही याचा निर्णय स्वतः धोनी घेईल, असं ठाम मत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीत ते याबाबत बोलत होते. 

(हेही वाचा...रणवीरने माझा गॉगल का घातलाय ? धोनीच्या लेकीचा प्रश्न)

शास्त्री म्हणाले, विश्वचषक स्पर्धेनंतर मी धोनीला भेटलो नाही. त्यामुळे आमची चर्चा झालेली नाही. त्याला संघात पुन्हा यायचं असेल, तर हा निर्णय त्याला स्वतःलाच घ्यावा लागेल. याबाबत निवड समितीलाही कळवावं लागेल. तसंच धोनीची तुलना नेहमीच भारताच्या महान खेळाडूंमध्ये होईल. तर तो नेहमी या यादीमध्ये वरच्या स्थानी असेल. परंतु धोनीने आधी खेळायला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर इतर गोष्टींचा विचार करता येईल.  

दरम्यान, विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर धोनीने एकदाही आंतरराष्ट्रीय सामना खेळाला नाही. सध्या तो लष्करात आपली सेवा बजावत आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली असून भारतीय क्रिकेटमध्ये तो चर्चेचा विषयच बनला आहे. त्यामुळे धोनी स्वतः यावर काय प्रतिक्रिया देणार यावर क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.  

(हेही वाचा...भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा; कॉम्पिटिटीव्ह इकॉनॉमीत ६८व्या स्थानावर)

web title : M. S. dhoni will decide whether he wants to comeback in the team says ravi shastri


Get sports news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest sports news in marathi.

0 Response(s) to “संघात येण्याबाबत धोनीच ठरवेल - रवी शास्त्री”

Leave a reply