news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

शस्त्रक्रियेनंतर पांड्या थेट व्हिलचेअरवर; चालताना घेतोय दुसऱ्याचा आधार

Hardik pandya shared video after surgery  Hardik pandya shared video after surgery

 

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर पांड्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो व्हिलचेअरवर बसलेला दिसत आहे. तर त्याला चालतानाही दुसऱ्याचा आधार घ्यावा लागत आहे. पांड्याला या अशा स्थितीत पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

(हेही वाचा...भारताचं पहिलं लढाऊ विमान, पॅरिसमध्ये 'राफेलास्त्रा'ची पूजा)

हार्दिक पांड्या सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. यावेळी व्हिडिओ शेअर करत पांड्याने चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनांसाठी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच आपण लवकरच कमबॅक करू, असं आश्वासनही त्यानं दिलं आहे. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या आशियाई चषकादरम्यान पाठीला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या दुखापतीतून पूर्ण बरं होण्यासाठी पांड्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत पांड्याला खेळता येणार नाही. 

 
 
 
View this post on Instagram

Surgery done successfully 🥳 Extremely grateful to everyone for your wishes ❣️ Will be back in no time! Till then miss me 😉

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) onOct 4, 2019 at 6:35pm PDT

 (हेही वाचा...जम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार; गुरुवारपासून पर्यटक आनंद लुटणार)

 

 web title : Hardik pandya shared video after surgery 


Get sports news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest sports news in marathi.

0 Response(s) to “शस्त्रक्रियेनंतर पांड्या थेट व्हिलचेअरवर; चालताना घेतोय दुसऱ्याचा आधार”

Leave a reply