news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

वैद्यकशास्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

2019 nobel prize for medicine has been awarded jointly 2019 nobel prize for medicine has been awarded jointly

 

जगभरात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. वैद्यकशास्राच्या पुरस्कारापासून ही सुरुवात झाली आहे. यावेळी वैद्यकशास्र क्षेत्रात तीन शास्रज्ञांना हा पुरस्कार विभागून दिला आहे. सर पिटर जे रॅटक्लिफ, ग्रेग एल सेमेन्जा आणि विल्यम जी केलीन जुनिअर या तिघांना फिजिओलॉजी या वैद्यकशास्रातील संशोधनासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कोशिकांच्या (सेल्सच्या) ऑक्सिजन ग्रहणासंबंधी करण्यात आलेल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

(हेही वाचा - फाळके पुरस्कारासाठी निवड, अभिनंदनाचा वर्षाव, बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार)

लैंगिक शोषणाच्या प्रकरणामुळे गेल्या वर्षी साहित्य नोबेलची घोषणा करणे अकादमीने टाळले होते. मात्र यंदा असे कोणतेही प्रकरण नसल्याचे समाधान व्यक्त करत जगभरातील जाणकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुरस्काराचे स्वरूप

प्रत्येक विजेत्याला साडेचार कोटी रुपये, एक प्रशस्तिपत्रक आणि २३ कॅरेट सोन्याचे सर आल्फ्रेड नोबल यांची प्रतिमा असलेले पदक देऊन सन्मानित करण्यात येते. या पदकावर त्यांच्या जन्माची आणि मृत्यूची तारीख असते. तसेच दुसऱ्या बाजूला युनानी देवी आयसीसचे चित्र असते. रॉयल अकादमी ऑफ स्टॉकहोमतर्फे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहितीही दिली जाते. 

(हेही वाचा - ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे 'गल्ली बॉय'ला मिळाली संधी)

नोबेल पुरस्कारांची घोषणा

सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी वैद्यकशास्राच्या पुरस्कारांची घोषणा

मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी भौतिकशास्राच्या पुरस्कारांची घोषणा

बुधवार, ९ ऑक्टोबर रोजी रसायनशास्राची घोषणा

गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी साहित्य पुरस्काराची घोषणा

शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी शांतता पुरस्काराची घोषणा

सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी अर्थशास्राच्या पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे

 

Web title - 2019 nobel prize for medicine has been awarded jointly

0 Response(s) to “वैद्यकशास्रातील नोबेल पुरस्कार जाहीर ”

Leave a reply