news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

सलमान खानच्या बंगल्यावरील केअरटेकरला अटक 

salman khan bunglow caretekar arrested salman khan bunglow caretekar arrested

 

सलमान खानच्या गोराई येथील बंगल्यावर केअरटेकची नोकरी करणारा शक्ती सिद्धेश्वर राणा या ६२ वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. १९९० मधील गुन्ह्यात जामिनावर बाहेर पडल्यानंतर शक्ती हा सलमान खानच्या बंगल्यात केअरटेकरची नोकरी करीत होता, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. े

सलमानच्या केअरटेकरला अटक

शक्ती शिदेश्वर राणा हा १९९० मध्ये वरळी येथे राहण्यास होता. यादरम्यान त्याने आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी एका घरात घुसून घरातील व्यक्तींना मारहाण करून जबरी चोरी केली होती. या गुन्ह्यात त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. वर्षभराने जामिनावर सुटल्यानंतर शक्ती हा न्यायालयाच्या तारखेला गैरहजर राहू लागल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. मुंबई पोलिसांनी त्याचा शोध घेऊनही तो राहत्या ठिकाणी मिळून येत नव्हता. बायको मुलांसह तो वरळी येथून फरार झाला होता. 

(हेही वाचा...पिळगांवकरांची सन्मानचिन्हे परत मिळण्याची आशा धूसर)

त्याचा शोध सुरू असताना तब्बल १५ वर्षांनी शक्ती हा सलमान खान याच्या गोराई येथील बंगल्यात केअरटेकर म्हणून नोकरी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ४च्या पथकाला मिळाली. पोलिसांनी बुधवारी शक्ती राणा याला सलमान खानच्या गोरे येथील बंगल्यातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शक्ती राणा हा मागील १५ वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांसह सलमान खानच्या गोराई येथील बंगल्याची देखरेखीचे काम करून बंगल्याशेजारीच असलेल्या नोकराच्या खोलीत राहण्यास होता. त्याला एका मुली असून तीदेखील त्याच्यासोबतच राहण्यास होती, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली. 

web title : salman khan bunglow caretekar arrested

0 Response(s) to “सलमान खानच्या बंगल्यावरील केअरटेकरला अटक ”

Leave a reply