news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

पत्नीच्या भांडणाला कंटाळला; दोन मुलांचा जीव घेतला

The father of two children who were killed after a dispute over his wife was arrested The father of two children who were killed after a dispute over his wife was arrested

 

घाटकोपर येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने पत्नीसोबत होणाऱ्या सततच्या भांडणाला कंटाळून स्वतःच्या दोन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्येच्या प्रयत्नात असताना त्याला पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथे पोलिसांनी अटक केली. दोन्ही मुलांचे मृतदेह पोलिसांना मोटारीच्या डिकीत सापडले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीशी भांडण, पोटच्या मुलांची हत्या

चंद्रकात मोहिते असे मुलांची हत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. चंद्रकांत हा पत्नी, ११ वर्षांची मुलगी गौरवी आणि ७ वर्षांचा मुलगा प्रतीक यांच्यासह घाटकोपर पश्चिम येथील जागृतीनगर येथे राहातो. ओला गाडीवर चालक म्हणून असणाऱ्या चंद्रकांतला क्षयरोग होता. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्या आजारपणाला कंटाळून सतत भांडण करून माहेरी निघून जात असे. पत्नीच्या सततच्या भांडणाला कंटाळून चंद्रकांतने अनेक वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र माझ्यानंतर मुलांचे काय होईल, या चिंतेत असणाऱ्या चंद्रकांतने मुलांना मारून स्वतः आत्महत्या करण्याचे ठरवले.

असा आखला बेत...

मंगळावरी दुपारी पत्नी भांडण करून माहेरी निघून गेल्यानंतर चंद्रकांत मुलांना घेऊन स्वतःच्या मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाला. जाण्यापूर्वी त्याने मोठ्या भावाला फोन करून पत्नीच्या सततच्या भांडणाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालो असल्याचे सांगून त्याने फोन कट केला. भावाने ताबडतोब घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी चंद्रकांतच्या मोटारीला असलेल्या जीपीएस माध्यमातून त्याचा माग घेतला असता त्याचे लोकेशन सातारा येथे दाखवत होते.

(हेही वाचा...मालाडमध्ये महिलेची हत्या करून लूट)

घाटकोपर पोलिसांनी सातारा पोलिसांना संपर्क साधून त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरा चंद्रकांतची मोटार पुणे ग्रामीणच्या शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडली. पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेऊन मोटार तपासली असता मोटारीच्या डिकीत दोन्ही मुलांचे मृतदेह आढळले. शिरवळ पोलिसांनी चंद्रकांतला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता मुलांना मीच गळा आवळून मारले आणि मीसुद्धा आत्महत्या करणार होतो, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी चंद्रकांत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 web title : The father of two children who were killed after a dispute over his wife was arrested

0 Response(s) to “पत्नीच्या भांडणाला कंटाळला; दोन मुलांचा जीव घेतला”

Leave a reply