news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

कोथरूड - पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ

 Kothrud is the most talked constituency this election Kothrud is the most talked constituency this election

कोथरुड मतदारसंघ

 

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रभावक्षेत्र असलेल्या पुण्यातील अनेक मतदारसंघात भाजपा-शवसेना युतीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. पुणे शहरात ८, पुणे ग्रामणी १० आणि पिंपरी-चिंचवड ३ अशा २१ मतदारसंघात यंदा अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्राचे भाजपा कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळालेला कोथरूड मतदारसंघ. चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने विद्यमान आमदार संध्या कुलकर्णी यांचं नाराजी नाट्य गेले काही दिवस रंगलं होतं. नंतर त्याला पूर्णविराम मिळाला असला तरी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने आपला उमेदवार पाटील यांच्या विरोधात उतरविल्याने या लढतीला जातीय रंग चढला आहे.

युतीची पकड

कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बाणेर, बालेवाडी, पाषाण या परिसरांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात मराठी आणि अमराठी मतदार आढळून येतात. पानशेतच्या पुरानंतर अनेकांचं पुनर्वसन कोथरूडला करण्यात आलं. आय टी इंडस्ट्री च्या वाढीबरोबर शहरीकरणात वाढ झाली. पण आजही बहुतेक भागात शहरासोबतच, गावांची ओळख देत गावठण भागही इथे आहे.

भाजपा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला कोथरूड मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही सलग १५ वर्ष कोथरुडकर शिवसेना-भाजपाच्या मागे उभे होते.
भारतीय जनता पार्टीचे अण्णा जोशी हे १९८२ आणि १९८६ ला इथून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ला निवडून आलेले शिवसेनेचे शशिकांत सुतार २०१४ पर्यंत निवडून येत राहिले. २०१४ मध्ये युती तुटल्याने भाजपाने त्याचा फायदा उचलला. तेव्हा भाजपाच्या मेधा कुलकर्णी ६५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या. शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा त्यांनी पराभव केला होता.

हेही वाचा - रणवीरने माझा गॉगल का घातलाय ? धोनीच्या लेकीचा प्रश्न

कोथरुडकर नाराज

यावेळेस मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. बहुतेक ब्राम्हण संघटनांनी पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ब्राम्हण महासंघाकडून मयुरेश अरगडे उमेदवारी अर्ज भरायला जात असताना, 'आमचं ठरलंय, कमळ सोडलंय' , 'चंदुदादा परत जा' अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

'माझ्या पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल मी पक्षाशी गद्दारी करणार नाही' अशी खंतही मेधा कुलकर्णी यांनी पक्षाच्या मेळाव्यात थेट खासदार गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यासमोर बोलून दाखवली होती.

विरोधक एकत्र

दुसरीकडे, काँग्रेस-राष्टवादी काँग्रेसच्या महाआघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोशोर शिंदेंना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा काहीशी जड जाणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. शिंदे यांना २ वेळा निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी आपला मतदारसंघ चांगल्या पद्धतीने बांधला आहे. याचाच फायदा त्यांना होईल, असं म्हटलं जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या गिरीश बापटांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून १,४८,५७० मतं मिळाली होती. तर, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या मोहन जोशींना ४२,३७४ मतं मिळाली होती. दोन्ही उमेदवारांच्या मतांमधला हा फरक तब्बल १ लाख ६ हजारांहून अधिक आहे. यावरुन कोथरुडचा अंदाज बांधणं फारसं अवघड नसलं तरी पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीमुळे कोथरूड मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरणार, हे मात्र नक्की.

चंद्रकांत पाटील यांची राजकीय कारकीर्द

 • १९७७ ते १९८० या दरम्यान मुंबईतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून चंद्रकांत पाटील कार्यरत होते.
 • १९८० ते १९८२ या काळात त्यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हामंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर २ वर्षातच, सन १९८२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
 • १९८४ मध्ये महाविद्यालयीन निवडणुका, विद्यापीठांमधील निवडणुका यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नाव चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा प्रभावीपणे दिसले.
 • १९९० मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
 • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी तरुणांची 'गर्जना' ही संघटना सुरू केली.
 • मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या प्रस्तावाला समाजातील विविध स्तरातून विरोध होत असताना चंद्रकात पाटील यांनी मराठवाड्यातील प्रत्येक गावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तरुणांची संवाद पथकं पाठवली.
 • १९९३ मध्ये त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम थांबवलं आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या आपल्या मूळ गावी स्थायिक होऊन कृषी संशोधन क्षेत्रात कार्य सुरू केल.
 • तरुणांनी मोठ्या प्रमाणावर नागरी सेवांमध्ये आपले करिअर करावे, या हेतूने त्यांनी ‘विद्या प्रबोधिनी’ हे स्पर्धा परीक्षा केंद्र कोल्हापुरात सुरू केले.
 • १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापूर विभागाचे ‘सहकार्यवाह’ म्हणून काम पहिले.
 • २००४ साली त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ‘महाराष्ट्र प्रदेश चिटणीस’ म्हणून काम पहिले. पुढे त्यांची सन २००८ साली पुणे पदवीधर विभागीय मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली. सन २००९ साली त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ‘महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस’ म्हणून आणि सन २०१३ मध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले.
 • जून २०१४ मध्ये त्यांची दुसऱ्यांदा पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली.
 • ऑक्टोबर २०१४ मध्ये महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सत्तारूढ झालेल्या महायुतीच्या शासनामध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून सहकार, पणन, वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांची जबाबदारी देण्यात आली.
 • जुलै २०१६ पासून, त्यांनी ‘महसूल, मदत आणि पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.
 • जुलै २०१९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

 

Web title - Kothrud is the most talked constituency this election


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “कोथरूड - पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ”

Leave a reply