news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही - शरद पवार

Talks about Congress and NCP joining together are not facts says NCP chief Sharad Pawar Talks about Congress and NCP joining together are not facts says NCP chief Sharad Pawar

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र होण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुशीलकुमार शिंदे सांगू शकत नाहीत, ते काँग्रेसबाबत सांगू शकतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत, असे पवार म्हणाले.

काय म्हणाले होते शिंदे

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील, असे भाकित माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी वर्तवले आहे. सोलापुरात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार. असे म्हणत त्यांनी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचे संकेत दिले आहेत.

 

web title - Talks about Congress and NCP joining together are not facts says NCP chief Sharad Pawar


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही - शरद पवार”

Leave a reply