news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

नगर जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य निकाल लागणार - उद्धव ठाकरे

in Nagar district election result will get 12 against 0 says Uddhav Thackeray in Sangamner rally in Nagar district election result will get 12 against 0 says Uddhav Thackeray in Sangamner rally

 

एकीकडे दोन्ही काँग्रेस थकलेली आहे, तर अनेक काँग्रेसवासी नेते युतीत सहभागी झालेत. त्यामुळे यंदा नगर जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य असाच निकाल लागेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात झाली असून संगमनेरमध्ये पहिली प्रचार सभा पार पडली. त्यात ते बोलत होते. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील, वैभव पिचड यांसह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

(हेही वाचा - भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा; कॉम्पिटिटीव्ह इकॉनॉमीत ६८व्या स्थानावर)

...तर बाळासाहेब थोरातांना जनताच घरी बसवेल

मला संगमनेर बरोबरच पूर्ण नगर जिल्हा भगवा करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा. काॅंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस इतकी वर्षे सत्तेत होती. त्यांनी काहीही केले नाही. म्हणूनच त्यांची ही स्थिती निर्माण झाली. बाळासाहेब थोरात तुम्हीही घरी बसा, नाहीतर जनताच तुम्हाला घरी बसवेल. तुमचा नेता आधीच बॅंकाॅकला पोहोचला आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

भाषणातील अन्य मुद्दे थोडक्यात

 • बाळासाहेब विखे धाडस करून भाजपामध्ये आले.
 • उद्या आपले सरकार येणार आहे.
 • दोन बाळासाहेबांची आठवण येते
 • आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही
 • महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेला आहे महायुती म्हणजे महायुती आघाडी वगैरे काही नको.
 • निवडणुका आल्यावर त्यांना बाजीप्रभू आठवले.
 • बाळासाहेब तुमचा नेता बँकॉकला पोहोचला आहे तुम्ही काळजी करू नका.
 • जे खरं आहे ते खरे सांगायला ठाकरे घाबरत नाही. तुम्ही करायला घाबरत नसाल तर मी बोलायला का घाबरू ?
 • मला नाही अब्रू तर मी कशाला घाबरू अशी यांची नीतिमत्ता आहे.
 • जे काही मी निर्णय घेतले ते शेतकऱ्यांच्या तुमच्या हिताचे होते.
 • जनतेबद्दल आम्ही जी नाराजी मांडली ती देवेंद्रजी ने मार्गे लावली म्हणून त्यांचे धन्यवाद.
 • विरोधकांचे बारा आहे वाजवायचे आहेत.
 • सुशील कुमार शिंदे तुम्ही खाऊन खाऊन थकलेले आहे.
 • तुम्हाला साठ वर्ष दिल्यानंतर सुद्धा कामे नाही झालीत बेरोजगारांचे तांडे फिरत आहेत. त्यांना आता कळत आहे बेरोजगारी काय असते कारण ते स्वतः बेकार झाले आहेत.
 • जो जो बेरोजगार आहे त्याला आम्ही संधी देणार आहोत युती सरकार हे काम मार्गी लावणार.
 • आमच्याकडे आता हाऊसफुल झालेल आहे सगळी चांगली चांगली माणसे आमच्याकडे आलेली आहेत.
 • ज्या जागा मी भाजपला सोडल्या आहेत तेथील शिवसैनिकांचे मी माफी मागत आहे. परंतु हे करत असताना माझ्या मनात कोणतेही पाप नाही.
 • आता आपण एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी सरकार घडवत आहोत.
 • विरोधक थंड पडलेले आहेत आमच्याकडे धगधगणारे निखारे आलेले आहेत.
 • आजची तरुण मंडळी पुढे आलेली आहेत.
 • शेतकऱ्यांची बाजू शिवसेनेने लावून धरली पुढेही लावून धरणार.
 • येत्या पाच वर्षात मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखवणार.
 • आजपर्यंत तुम्ही काय केलं याचे उत्तर तुम्ही आमच्याकडे मागायचे आहे.
 • गोरगरिबांना १० रुपयांमध्ये थाळी मी देणार.
 • प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आपण देणार आहोत.
 • धरणांची कामे रस्त्यांची कामे आहेत ती करण्यासाठी सत्ता हवी आहे तरच आपण ही कामे करू शकतो.
 • गरिबांच्या आरोग्य चाचण्या या एक रुपयांमध्ये आपण करून देणार आहोत.
 • मी कर्जमुक्त नाहीतर तुम्हाला चिंतामुक्त करणार आहे.
 • दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार कसे मिळतील याची उपाययोजना करणार आहे.
 • राहुल गांधी येऊन गेले काय बोलले तुम्हाला कळलं का माहिती नाही.
 • तुमचे भविष्य कसे हवे आहे हे तुम्ही ठरवणार आहात.
 • महायुती शिवाय पर्याय नाही.
 • जो निर्णय आपण घेतलेला आहे महायुती करण्याचा तो तुम्हाला पटलेला आहे की नाही.
 • मला संगमनेर ने नवल घडवून दाखवलं पाहिजे.
 • संगमनेर बरोबरच पूर्ण नगर जिल्हा भगवा करायचा आहे.

 

web title - in Nagar district election result will get 12 against 0 says Uddhav Thackeray in Sangamner rally 


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “नगर जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य निकाल लागणार - उद्धव ठाकरे”

Leave a reply