news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

'पवारांचा पक्ष अर्धा रिकामा झालाय, उरलेला निवडणुकीनंतर रिकामा होईल'

cm devendra fadanavis campaign tour in dhule district today cm devendra fadanavis campaign tour in dhule district today

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे. आता हेच पक्ष रस्त्यावर उतरुन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी धुळे दौऱ्यावर आहेत.

धुळे ग्रामीण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारासाठी शिरपूर येथे दुपारी मुख्यमंत्री सभा घेतली आहे. त्यानंतर आता साक्री येथे महायुतीचे उमेदवार मोहन सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी सभा घेतील.

विरोधकांवर टीका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला गेले आहेत. त्यांना माहीत आहे की, काँग्रेसचं काहीच होणार नाही. उगाच प्रचारासाठी जायचं आणि पराभवाचं खापर आपल्या डोक्यावर फोडून घ्यायच. म्हणून ते महाराष्ट्रात येतच नाहीत. इथे शरद पवार नुसते फिरत आहेत. त्यांच्या पक्षात कुणी राहिलंच नाहीये. जे राहिलेत ते निवडणुकीनंतर दिसणार नाहीत. आमचे उमेदवार तेल लावून मैदानात उतरले आहेत. पण, समोर कुणीच दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपाच्या उमेदवारांसमोर टिकू शकत नाहीत. 

भाजपा-सेनेचा सामना करण्यासाठी अशी अवस्था या पक्षांची झालीय. निवडणूक हरल्याचं यांनी मान्यच केलंय. महाआघाडीने दोन दिवसांपूर्वी जाहीरनामा घोषित केला. त्यांचा जाहीरनामा म्हणजे जगातले सगळेच आश्वासन दिलेत. या जाहीरनाम्यात एकच आश्वासन द्यायचं राहिलंय. ते म्हणजे, 'महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एक-एक ताजमहाल बांधून देऊ,' एवढंच आश्वासन द्यायचं राहिलंय, असे म्हणत फडणवीस यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही मुद्दे

- ३ टप्प्यात महाजनादेश यात्रा केल्यानंतर आजपासून प्रचारसभा घेतोय

- धुळेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवून भाजपा उमेदवाराला एका लाखाचा लीड देत विजयी केलं

- निवडणुकीत मज्जा येत नाहीये, आमचा पेहलवान तेल लावून तयार आहे पण, समोर कोणीच नाहीये

- काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला गेलेत, महाराष्ट्रात येऊन पराभवाचं खापर आपल्या डोक्यावर का फोडून घ्यायचं हा विचार त्यांनी केला असेल.

- राष्ट्रवादीचे शरद पवार फक्त फिरत आहेत. त्यांच्या पक्षात कोणता नेताच उरला नाही. 

- राष्ट्रवादीत जे राहिले आहेत ते निवडणुकीनंतर नसतील

- आपण जिंकणारच नाही, हे माहीत असल्याने आघाडी सरकारने आपला आश्वासनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलं.

- ते मोठे झाले, त्यांनी जनतेला मोठं केलं नाही

- केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात भाजपा सरकाने जनतेसाठी काम केलं.

- भाजपाने ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, 

 - गेल्या ५ वर्षात सिंचनाचं काम पूर्ण केलं.

- जलयुक्त शिवाराची काम केली.
- दीड लाख शेतकऱ्यांना विहीरी दिल्या.
- विरोधकांच १५ वर्ष सरकार होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही
- येत्या काळात धुळेकरांना जिल्हा सोडून जावं लागणार नाही

- २०२२ पर्यंत महाराष्ट्रात एकही बेघर राहणार नाही

- धुळ्यातील शिबिराच्या माध्यमातून सव्वा लाखाचं काम केलं.

- धुळे ग्रामीणला सुजलाम् सुफलाम करणार

- राष्ट्रवादी-काँग्रेसने १५ वर्षात केलेल्या कामापेक्षा आम्ही ५ वर्षात दुप्पट काम केलं

- पूर्वी आपल्या पंतप्रधानाला अमेरिकेत मंत्रीही विचारत नव्हता. आता आपल्या नरेंद्र मोदी याचं भाषण ऐकण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दीड तास जनतेमध्ये बसले

- नरेंद्र मोदी वैश्विक नेते असल्याचं अमेरिकेने देखील मान्य केलंय

- धुळे जिल्ह्यातील सर्व जागा भाजपा, शिवसेनेच्या महायुतीला मिळवून द्या. 

 

 

 

हेही वाचा - रणवीरने माझा गॉगल का घातलाय ? धोनीच्या लेकीचा प्रश्न
Web title - cm devendra fadanavis campaign tour in dhule district today


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “'पवारांचा पक्ष अर्धा रिकामा झालाय, उरलेला निवडणुकीनंतर रिकामा होईल'”

Leave a reply