news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयाची शक्यता कमीच - सलमान खुर्शीद

Congress Party's victory in the Maharashtra and Haryana Assembly elections is unlikely says Congress Leader Salman Khurshid Congress Party's victory in the Maharashtra and Haryana Assembly elections is unlikely says Congress Leader Salman Khurshid

 

लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातूनच पक्ष अद्याप बाहेर पडला नाही. त्यामुळे पक्षाला संकटांचा सामना करावा लागत आहे. आगामी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयाची शक्यता कमीच आहे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विलिनीकरणाचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आता खुर्शीद यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ सुरू झाली आहे.

(हेही वाचा - ७४ वर्षांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बाॅम्ब निकामी करताना स्फोट, दोघे ठार)

काँग्रेसच्या विधानसभांच्या विजयाची शक्यता कमी  

सध्या पक्ष एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी आहे. तसंच पक्ष सध्या पक्ष आपलं भविष्यही ठरवू शकत नाही अशा परिस्थितीत पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना का करावा लागला याचं एकत्रित विश्लेषणही आम्ही करू शकलो नाही. 2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळवता आला होता. तर भाजपाने 303 जागांवर मुसंडी मारली होती. आता 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता काँग्रेससमोर राज्यात मोठं आव्हान असणार आहे.

राहुल गांधीच्या राजीनाम्यामुळे संकट वाढले

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं पक्षावरील संकट आणखी वाढलं आहे, असं ते म्हणाले. आमचे नेते सोडून गेले हीच आमची मोठी समस्या आहे. राहुल गांधी यांच्यावर आताही पक्षाचा विश्वास आहे. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्या नव्या अध्यक्षाच्या प्रतिक्षेत आहेत. केवळ अध्यक्षपद रिक्त होतं म्हणून त्या या पदावर असल्याची त्यांनी धारणा आहे. परंतु असं असू नये अशी मी आशा करतो.

 

web title - Congress Party's victory in the Maharashtra and Haryana Assembly elections is unlikely says Congress Leader Salman Khurshid 


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयाची शक्यता कमीच - सलमान खुर्शीद”

Leave a reply