news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

लष्कर व जवानांच्या नावे मतं मागणारं मोदी सरकार - शरद पवार

Modi government asked votes on indian army and jawans - sharad pawar   Modi government asked votes on indian army and jawans - sharad pawar

 

लष्कर आणि जवानांच्या नावे मतं मागणारं पंतप्रधान मोदी यांचं सरकार आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. अकोल्याचे उमेदवार संग्राम गुलाबराव गावंडे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

शरद पवार यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधान मोदींवर यावेळी निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी देशाच्या संरक्षणाच मुद्दा निवडणुकीत आणला. पुलवामामध्ये झालेला दशतवादी हल्ला तसंच लष्कर आणि जवानांनी केलेल्या शौर्याच्या कामगिरीचा फायदा त्यांनी मतं मागण्यासाठी केला. घर में घुस के मारुंगा, असं मोदी बोलत होते. तर हे आता दिल्लीत बसून सांगणार घुसके मारुंगा, असा उपरोधिक टोलाही पवारांनी लगावला आहे. दरम्यान, याआधी कधीही लष्कराचा असा उपयोग मतांसाठी करण्यात आला नव्हता, असं पवार म्हणाले. तसंच सैन्याने दाखवलेल्या शौर्याच्या कामाचा उपयोग त्या काळी इंदिरा गांधींनी देखील कधी केला नाही, असं त्यांनी म्हटलं.  

 

 

 शरद पवार यांच्या भाषणातील काही मुद्दे थोडक्यात :

- विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शुभेच्छा 

- उद्याच्या २१ तारखेला आपल्याला मतदानाचा हक्क बजवायचा आहे 

- राहिलेल्या या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्याची विनंती जनतेला करत आहे

-  लोकसभेच्या निवडणुकीला एक वेगळा निकाल लागला 

- सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदींनी देशाच्या रक्षणाचा मुद्दा मांडला 

- याधी कोणीही लष्कर व जवानांच्या नावे मतं मागितली नाही 

- सैन्याने दाखवलेल्या शौर्याचा उपयोग त्या काळी इंदिरा गांधींनी कधी केला नाही 

- हवाई दलाचा फायदा देशाला झाला, परंतु मोदींनी आपलं नाव त्यात पुढे केलं 

- हे दिल्लीत बसून सांगणार घूस के मारुंगा

- राज्य त्यांच्या हातात गेलं 

- देशातील सर्वसामान्यांच्या समस्या आता वाढल्या आहेत

- देशात यंदा १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली 

- यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली 

- तिथे जाऊन मी त्या कुटुंबियांची भेट घेतली  

- कर्जाचं ओझं डोक्यावर होतं, असं उत्तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने दिलं 

- ज्या दिवशी ही घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी दिल्लीत गेलो आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली 

- आम्ही व्याजदर कमी केला  

- बँकेवर आम्ही ओझं टाकलं नाही 

- आज काय चित्र दिसत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला शेतकऱ्याविषयी आस्था नाही  

- शेतकरीही इतिहास घडवू शकतो हे विदर्भातील तर मुख्यतः अकोल्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलं

- एकेकाळी सोयाबीनला १२ हजार भाव होता आता ३ हजार असा भाव आहे  

- सध्याचे मुख्यमंत्री  म्हणाले ७ हजार क्विंटलने भाव देतो, दिला का?

- अशा सरकारला घरचा रस्ता दाखवला पाहिजे 

कर्जमाफीवर भाष्य 

- माझा कर्जमाफीला पाठिंबा आहे

- सरसकट कर्जमाफी करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 

- पण प्रत्यक्षात तसं झालं नाही 

----------------------------

- शेतकऱ्याच्या उत्पादनाचं उत्पन्न मिळालं पाहिजे 

- मी आहे तोपर्यंत कष्टकऱ्याला त्याच्या घामाची किंमत मिळेल 

-------------------------------------------------

- मुंबईत आणि ओल्यातील गिरण्या बंद झाल्या  

- यांच्या सरकारने कारखाने बंद करण्याचं काम केलं 

- कारखाने बंद केल्याने बेकारी आणि बेरोजगारी वाढली 

- गेल्या पाच वर्षांत जेवढी बेरोजगारी झाली तेवढी याआधी कधीही झाली नाही

- 'जेट'मधल्या अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या 

- भाजपा आणि सेनेच्या निर्णयामुळे हे झालं आहे  

- कोणासाठी नेमका विकास चालू आहे

-----------------------

नोटबंदीवर टीका 

- मोदींनी एका रात्रीत नोटबंदी होणार असं जाहीर केलं

- दुसऱ्या दिवशी संपूर्ण देश बँकेबाहेर होता 

- १०० लोक रांगेत उभे राहून ऊन सहन झालं नाही म्हणून मृत्यूममुखी पडले 

- अनेकांच्या नोटा स्वीकारल्या गेल्या नाहीत 

- अहमदाबाद मधील केवळ एका बँकेत लगेच नोटा बदलून देण्यात आल्या, त्या बँकेचे अध्यक्ष आताचे भाजपा अध्यक्ष आहेत  

-------------------------------------------------------

- भाजपाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना महिलेवर अत्याचार केल्याप्रकणी अटक केलं

- अशी तुम्ही स्त्रियांची किंमत करता?

- शेतकरी, कामगार, स्त्रिया यांचं नुकसान या सरकारने केलं आहे 

------------------------------------------

- आता नवी पिढी राजकारणात आणणार आहे

- मी पण अजून तरुण आहे 

- या सर्वांनाच घरी पाठवूनच मी जाईन  

- आज गांधी, नेहरू यांचे विचार संपवण्याचं काम भाजपा करत आहे 

- म्हणून आता नवी पिढी राजकारणात उतरवणार आहे 

- अकोल्याने स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सहभाग घेतला 

- योग्य परिवर्तन करण्यास पुन्हा तुमचा हातभार लावा 

 

web title : Modi government asked votes on indian army and jawans - sharad pawar  

 

 

 

 

 

 

 


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “लष्कर व जवानांच्या नावे मतं मागणारं मोदी सरकार - शरद पवार ”

Leave a reply