news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

पाटण मतदारसंघ : दोन घराण्यांमधील चाळीस वर्षांचा अविश्रांत संघर्ष !

Special political analysis for Patan Assembly Constituency of satara district Special political analysis for Patan Assembly Constituency of satara district

 

सातारा जिल्ह्यातल्या फलटण, सातारा, माण, पाटण, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव आणि वाई या मतदारसंघात यंदा चुरशीच्या लढती पाहायला मिळतायत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार विधानसभेवर पाठविण्याची जोरदार तयारी भाजपाने चालविली आहे. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचा एक, असे आठ आमदार आहेत.

(हेही वाचा - 'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम)

मतदारसंघांविषयी माहिती

पूर्वी साताऱ्यात १० मतदारसंघ होते. त्यावेळी अनेक राजकीय कुटुंबांमध्ये राजकीय संघर्ष चालू असायचा कालांतराने तो काही ठिकाणी थांबला तर काही ठिकाणी कमी झाला. रामराजे-कै. चिमणराव कदम, खा. उदयनराजे-आ. शिवेंद्रसिंहराजे, कै. भाऊसाहेब गुदगे-डॉ. येळगावकर, कै. लक्ष्मणतात्या-प्रतापभाऊ-मदनराव, कै. यशवंतराव मोहिते-कै. जयवंतराव भोसले, विलासकाका उंडाळकर-आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब-विलासकाका-आ. पृथ्वीराज चव्हाण, कै.शंकरराव जगताप-डॉ. शालिनीताई हे आणि असे अनेक संघर्ष साताऱ्याने याआधी पाहिलेयत. जागा वाटपात नाराज असलेल्या शिवसेनेच्या इच्छूकांनी बंडाचं निशाण फडकवलं असलं तरीही आपली पूर्ण ताकद लावून भाजपाने माण, सातारा, वाई, कराड दक्षिण आणि फलटण मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. पैकी पाटण, कराड दक्षिण, वाई आणि सातारा येथे पारंपारिक लढती होतील.

शंभूराज देसाई विरुद्ध विक्रमसिंह पाटणकर 

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह पाटणकर यांचा १,०४,४१९ विरुद्ध ८५,५९५ मतांनी पराभव केला होता. यावेळेसही दोघांमधली ही लढत चुरशीची होईल. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या मेगाभरतीमुळे भाजपाला फायदा होणार असला, तरी कार्यकर्त्यांचे अंतर्गत राजकारण थोड्या प्रमाणात का होईना महत्वाचे ठरू शकते.

(हेही वाचा - रणवीरने माझा गॉगल का घातलाय ? धोनीच्या लेकीचा प्रश्न)

पाटण विधानसभा मतदारसंघ

१९८० पासून कै. बाळासाहेब देसाई आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या दरम्यान सुरू झालेला राजकीय संघर्ष आजही अविरतपणे सुरू आहे. आ. शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर हे या संघर्षाची धुरा सांभाळतायत. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात काय चालत याच्याशी या मतदारसंघाच काहीच घेणं देणं नसत. इथे फक्त पाटणकर आणि देसाई या दोनच गटात राजकारण रंगत.

इथे चालते फक्त नेत्यांवरील निष्ठा

तालुका दुर्गम असला तरी दोन्ही नेत्यांना गाव अन गाव आणि वाडी-वस्ती यांची संपूर्ण माहिती आहे. इतर मतदारसंघापेक्षा या तालुक्याची विशेष बाब म्हणजे येथे नेत्यांना भेटायला तालुका पातळीवरील प्रमुख कार्यकर्त्यांची, चेअरमन, जिल्हा परिषद वा पंचायत समिती सदस्यांच्या फोनची गरज नसते. सामान्य नागरिक आणि कार्यकर्ता थेट आपले प्रश्न घेऊन नेत्याच्या कानाजवळ पोहोचतो. नेत्याच्या निवडणुकीला स्वतः खर्च करून पदरमोड करणारे कार्यकर्ते याच तालुक्यात मिळतील. नेते सुद्धा थेट सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून असतात त्यामुळे गटातटाच राजकारण इथे खूप नगण्य असत. तालुक्यातील प्रत्येकी ४५ टक्के मते अगोदरच फिक्स असतात राहतो विषय फक्त उरलेल्या १० टक्के मतांचा त्यावर जो पकड मिळवेल त्याचा विजय निश्चित असतो.
 
 
दोन्ही नेत्यांची मजबूत पकड
 
तालुक्यात खूप जण पैसेवाले असतील पण राजकारणात या दोघांशिवाय जम बसवणे शक्य नाही. नेत्यांची बाजू घेऊन भांडायला न थकणारी माणसं तर आहेतच पण विरोधकांचा गुलाल जरी अंगावर पडला तर लगेच शर्ट धुऊन घालणारे कट्टर कार्यकर्ते सुद्धा या क्षेत्रात पाहायला मिळतात. आपापल्या नेत्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारी जनता महाराष्ट्राच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळते. देसाई आणि पाटणकर या दोन्ही घराण्यांनी तालुक्याच्या जनतेवर सुद्धा तितकच प्रेम केलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यापासूनच त्यांना पाठबळ आणि संरक्षण देण्यापर्यंत प्रत्येक जबाबदारी दोन्ही घरांनी यशस्वीरीत्या पार पाडलीय. नेहमीच एकमेकांविरोधात शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले करणाऱ्या या नेत्यांनी कधीही कार्यकर्त्यांमध्ये झुंबड लावून द्यायचा उद्योग केला नाही हे विशेष. दोन्ही नेत्यांसाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या वस्त्यांमधला कार्यकर्ता हा कुटुंबातील सदस्य तर प्रत्येक कुटुंबासाठी नेते हे घरचे सदस्य असल्यासारखे वागतात. 
 
 
 
web title - Special political analysis for Patan Assembly Constituency of satara district, Shambhuraj Desai vs Vikramsingh Patankar 
 

Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “पाटण मतदारसंघ : दोन घराण्यांमधील चाळीस वर्षांचा अविश्रांत संघर्ष !”

Leave a reply