news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यात आश्वासनांची लूट

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आश्वासनांची लूट केली. यात १० रुपयांमध्ये गोरगरिबांना सकस आहाराची थाळी देणार, ३०० युनिट पर्यंतचा विजेचा दर कमी करणार, सुदृढ महाराष्ट्र्र घडवण्यासाठी एक रुपयात आरोग्य चाचणी केंद्र उभे करणार, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याना बस सेवा देणार आदींचा समावेश आहे. ते शिवसेनेच्या ५३ व्या दसरा मेळाव्यात बोलत होते.

 

 

अजित पवारांचे नकाश्रू

अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याचाही ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले. अजित पवार हे म्हणतात राजकारणाचा स्तर खालावला आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू आले. शेतकरी पाणी नाही असं सांगत होता, तेव्हा तुम्ही काय बोललात ते विसरू नका, तुमच्या कर्मानं डोळ्यात पाणी आणलेलं आहे. तसेच सुडाचं राजकारण कोणीही महाराष्ट्रात करायला गेल्यास त्याला मोडून टाकू, शिवरायांचा महाराष्ट्र सुडाचं राजकारण कधीही सहन करणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.  

शरद पवारांवरही केली टीका

2000 साली जे तुम्ही करत होतात. त्यावेळी का महाराष्ट्र धगधगता ठेवला होतात. शिवसेनाप्रमुखांना अटक झाली, लोकांची धावपळ झाली. 1992-93 ला बाबरी कुठे पाडली, पण शिवसेनाप्रमुखांना इथे अटक करण्यात आली. बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, असा प्रश्नही ठाकरेंनी काँग्रेस आणि पवारांना विचारला. 

 

उद्धव ठाकरे

 

गेली 53 वर्ष आपण ही परंपरा पाळत आहोत. देशातली एकमेवा संघटना आहे जी समाजकारण आणि राजकारण देखील करते

दसरा आहे सोन लुटायचे असते.तुमच्या सर्वांचे पूजन करून याच महिन्यात विधानसभेत भगवा फडकवण्यासाठी निघालो आहे.

एका महिन्यात दोन विजयादशमी येथे एक आज आणि दुसरी 24 ला

या महिन्यामध्ये राम मंदिराचा निकाल लागेल असे म्हणत आहेत.

कोर्टाने निकाल दिला तर योग्यच पण आमची मागणी आहे ती आम्ही शेवट पर्यत सोडणार नाही

आम्ही आयुष्यात वचनाला जगतो

प्राण जाये पण वचन न जाये

या देशात मला राम मंदिर हवे

आमचा कारभार हा प्रभू रामचंद्रासारखा असेल

राम मंदिर बांधायचे आणि वचन तोडायची हे रामाला देखील न पटणारे

उद्या राम म्हणेल रावणा पेक्षा याना मारलेल बरे

आज अनेक मित्र शिवसेनेला मिळत आहेत.

आपल्या देशावर प्रेम करणारे मुसलमान देखील आहेत

आता धनगराच्या काठीला धार असली पाहिजे

आता तुमच्या काठीला तलवारीची धार यायला हवी

तुमची काठी नाठाळाच्या माथी मारा

सत्ता तर मला पाहिजेत ती कोणत्याही परिस्थितीत हवी

युती केली कुणाला वाटलं असेल की शिवसेना झुकली

चंद्रकांत पाटील म्हणाले आम्हाला समजून घ्या

आता आम्ही समजून घेतले

हे शिवसैनिक माझी तलवार आहे

वाघ नख ही कोथळा बाहेर काढत आहेत

त्यामुळे शिवसैनिकांच्या पाठीत वार करण्याचा कुणी प्रयत्न करू नका

शरद पवार, मुलायम सिंग, मायावती, मुक्ती पंतप्रधान चालेल असते का?

म्हणून मी त्यावेळी विचार केला की आपली ताकद मी काँग्रेसच्या मागे उभी करणार नाही

जे करायचे ते उघड उघड करायचे हे शिवसेनेची औलाद आहे

लपूनछपून करत नाही

भगवा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत

या महिन्यामध्ये राम मंदिराचा निकाल लागेल असे म्हणत आहेत.

कोर्टाने निकाल दिला तर योग्यच पण आमची मागणी आहे ती आम्ही शेवट पर्यत सोडणार नाही

आम्ही आयुष्यात वचनाला जगतो

प्राण जाये पण वचन न जाये

या देशात मला राम मंदिर हवे

आमचा कारभार हा प्रभू रामचंद्रासारखा असेल

राम मंदिर बांधायचे आणि वचन तोडायची हे रामाला देखील न पटणारे

उद्या राम म्हणेल रावणा पेक्षा याना मारलेल बरे

आज अनेक मित्र शिवसेनेला मिळत आहेत.

आपल्या देशावर प्रेम करणारे मुसलमान देखील आहेत

आता धनगराच्या काठीला धार असली पाहिजे

आता तुमच्या काठीला तलवारीची धार यायला हवी

तुमची काठी नाठाळाच्या माथी मारा

सत्ता तर मला पाहिजेत ती कोणत्याही परिस्थितीत हवी

युती केली कुणाला वाटलं असेल की शिवसेना झुकली

चंद्रकांत पाटील म्हणाले आम्हाला समजून घ्या

आता आम्ही समजून घेतले

हे शिवसैनिक माझी तलवार आहे

वाघ नख ही कोथळा बाहेर काढत आहेत

त्यामुळे शिवसैनिकांच्या पाठीत वार करण्याचा कुणी प्रयत्न करू नका

शरद पवार, मुलायम सिंग, मायावती, मुक्ती पंतप्रधान चालेल असते का?

म्हणून मी त्यावेळी विचार केला की आपली ताकद मी काँग्रेसच्या मागे उभी करणार नाही

जे करायचे ते उघड उघड करायचे हे शिवसेनेची औलाद आहे

लपूनछपून करत नाही

जो पर्यत त्यांचे टार्गेट आम्ही आहोत तोपर्यत आमचे टार्गेट हे शरद पवार आणि काँग्रेस असणार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेर्सने एक ठरवावे त्यांचा नेता कोण असणार

आता जास्त थकू नका विजयाचे पेढे खायला रहा

अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू

अजित पवार म्हणाले राजकारणाचा स्थर ढळू लागला म्हणून मी शेती करणार

पण धरणात पाणी नसेल तर काय करणार

जेव्हा शेतकरी डोळयांत पाणी घेऊन येत होता तेव्हा तुम्ही काय करत होता

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेर्सने एक ठरवावे त्यांचा नेता कोण असणार

आता जास्त थकू नका विजयाचे पेढे खायला रहा

अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू

अजित पवार म्हणाले राजकारणाचा स्थर ढळू लागला म्हणून मी शेती करणार

पण धरणात पाणी नसेल तर काय करणार

जेव्हा शेतकरी डोळयांत पाणी घेऊन येत होता तेव्हा तुम्ही काय करत होता

शरद पवार हे ईडी सोबत गेले

मला माहित नाही खर कारण काय आहे ते

जर सुडाचे राजकारण कुणी करत असेल तर शिवसेना त्याला सोडणार नाही

आज तुम्ही म्हणता ईडी म्हणजे सुडाचे राजकारण मग 2000 साली का तुम्ही महाराष्ट्राला छळल

92-93 साली बाबरी तिथे पडली त्याचे लोण मुंबईत पडले

शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांच्या जोरावर मुंबई आणि हिंदूंना वाचवले

10 रुपयात मी गोर गरिबांना अन्नाची थाळी देणार

संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिल 30 टक्क्यांनी कमी करणार

सुदृढ महाराष्ट्र्र घडवण्यासाठी एक रुपयात आरोग्याची चाचणी करणारा

ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याना बस सेवा देणार

# युवाशक्तीला काम हे मिळालेच पाहिजे.
# भारताकडे युवाशक्ती ही खूप मोठी ताकद आहे.
# युवकांना मला सांगायचे आहे की आता तुम्ही पुढे या आजपर्यंत इतिहास हा युवकांनी घडवला आहे पुन्हा इतिहास घडवण्यासाठी युवकांनीच पुढे या. महाराष्ट्र तुमचा आहे.

 

 

संजय राऊत

 • मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे
 • शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही.
 • शिवसेना ही महाराष्ट्र्र केसरी आणि आता हिंद केसरी आहे. आमच्यासमोर कोणताही पहलावान टिकला नाही
 • पुरे देश मे शोर है महाराष्ट्र मे शिवसेनेका जोर है
 • 2019 च्या निर्णायक लढाईसाठी शिवसेना सज्ज झालीय
 • आज शिवसेना थोडी शांत आहे त्यामुळे आज युती झाली. त्यामुळे जपून बोलावं लागत. काही बेड्या हातात पडल्या आहेत. कारण आम्ही दोस्ती आणि नाती पाळतो
 • त्यादीवशी उद्धव ठाकरेंना मी म्हणालो आपण 124 जागा लढवत आहोत. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आकड्यात आणि वाकड्यात जाऊ नये
 • आता 124 गड जिंकायचे आहेत
 • 24 तारीखला आपल्याला हे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना गड द्यायचे आहेत.
 • लाटा येतात आणि जातात

 

सुभाष देसाई

 • इतिहासात मराठा वीर सिमोलंघन करून दसऱ्याचे सोने लुटत असतं. शिवसेना देखील आता सीमा पार करणार आहे.
 • उद्धव साहेब यांनी शिवसेनेला बरीच पाऊले पुढे नेली आहे.
 • या वेळेस १०० पेक्षा जास्त आमदार विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जाणार आहेत.
 • या महाराष्ट्रासाठी शिवसेनेकडून नाराज झालेल्या उमेदवारांनी आर्ज मागे घ्यावे आणि या येणाऱ्या भगव्या शिवशाहीचे साक्षीदार व्हावे.
 • शिवसेनेच्या आंदोलनामुळे मराठी माणसाला हक्क मिळालेला आहे.
 • ८०% नोकऱ्या या भूमिपुत्रांना मिळणार असा कायदा शिवसेना आणणार आहे.

प्रकाश शेंडगे

 • उद्धव साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला या शिवतीर्थावर मला आमची व्यथा मांडण्याची संधी दिली.
 • गेली ७० वर्षे आम्ही आमची व्यथा कोणाकडे मांडायची.. तेव्हा पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी आश्वासन दिले की आमच्यासोबत या. महाराष्ट्रात छोट्या छोट्या जातींना शिवसेना शिवाय पर्याय नाही.
 • आम्ही उद्धव साहेब यांना शब्द देतो की छोट्या छोट्या ग्रामपंचायत असतील तिथे सर्विकडे शिवसेनेचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवय राहणार नाही.

 

 

web title - Shivsena 53 Dasara Melava Shivaji Park


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यात आश्वासनांची लूट”

Leave a reply