news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

सुशीलकुमार शिंदेंनी दिले काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत

Congress And NCP Will Merge Together In Future Says Sushilkumar Shinde Congress And NCP Will Merge Together In Future Says Sushilkumar Shinde

 

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन होतील, असे भाकित माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वर्तवले आहे. सोलापुरात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

(हेही वाचा - भारताचं पहिलं लढाऊ विमान, पॅरिसमध्ये 'राफेलास्त्रा'ची पूजा)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार. असे म्हणत त्यांनी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचे संकेत दिले आहेत.

शिंदे यांच्या या भाकितानंतर चे नेते आणि काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यात आव्हाड म्हणाले की, देशात सध्या हिटलरशाही आहे. या हिटलरशाही विरोधात एकत्र यायचं असेल, तर दोन्ही पक्षांनी हातात हात घेणं गरजेचं आहे. विलिनीकरणाचं म्हणाल तर त्याबाबतचा निर्णय पवार आणि शिंदे हे घेऊ शकतात मी त्याबाबत बोलणं योग्य नाही.

- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले ते वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत आहे. मात्र सध्याचं जे वातावरण देशात आहे, ज्या प्रकारचं सरकार आहे ते उलथवून टाकायचं असेल, तर दोन्ही पक्षांनी एकत्र येणं आणि एकमेकांना साथ देणं आवश्यक आहे.

- सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

 

web title - Congress And NCP Will Merge Together In Future Says Sushilkumar Shinde


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “सुशीलकुमार शिंदेंनी दिले काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत”

Leave a reply