news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम

Shivsena candidate dipali sayyed campaigning with two different names in Mumbra-kalwa constituency Shivsena candidate dipali sayyed campaigning with two different names in Mumbra-kalwa constituency

 

आगामी निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला असून अनेक राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या नवनव्या शक्कल लढवल्या जात आहेत. यात शिवसेनाही मागे नसून पक्षाच्या महिला उमेदवाराने चक्क आपल्या नावाचा वापर करत मतदार राजाला खुश करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आता तुम्ही म्हणाला नावात एवढं काय? पण नावातच सर्व काही असून सेनेच्या या उमेदवाराने खुशाल आपला प्रचार सुरू ठेवला आहे.     

(हेही वाचा...नितेश राणे रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात, राजकीय वर्तुळात चर्चा)

शिवसेनेच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद या कळवा-मुंब्रा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. दीपाली या आवश्यकतेनुसार दोन नावांचा वापर करत पक्षाचा प्रचार करत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच झालं असं, की दीपाली यांचं लग्नापूर्वीच नाव दीपाली भोसले असं आहे. तर लग्नानंतरच त्यांचं नाव सोफिया सय्यद असं आहे. त्या अधिकृतपणे आपलं नाव दीपाली सय्यद असंच लावत असून निवडणूक अर्जातही त्याची अशीच नोंद आहे. परंतु ते म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ. तसंच निवडणुकीच्या प्रचारातही सर्व काही माफ असून त्यांच्या दोन्ही नावांचा अत्यंत हुशारीने प्रचारात वापर केला जात आहे.  

हिंदू आणि मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याची सेनेची खेळी

कळवा-मुंब्रा या मतदारसंघात हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही मतदारवर्ग मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे कळवा व इतर भागांत असणाऱ्या हिंदू मतदारवर्गात 'दीपाली' म्हणून त्यांचा प्रचार केला जातो. तर मुंब्रा व अन्य भागांतील मुस्लिम मतदारवर्गासाठी त्या 'सोफिया सय्यद' म्हणून ओळखल्या जातात. अशा तऱ्हेने उमेदवाराच्या दोन्ही नावांचा वापर करत शिवसेनेला हिंदू, मुस्लिम या मतदारवर्गाला आकर्षित करण्याची चांगलीच संधी मिळाली आहे.    

(हेही वाचा...भागवतांच्या नेतृत्वात अनेक बॉम्बस्फोटात सहभागी, माजी प्रचारकाचे विधान)

web title : Shivsena candidate dipali sayyed campaigning with two different names in Mumbra-kalwa constituency 

 

 

 

Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम”

Leave a reply