news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

तुरुंगात टाकलं तरी जनतेसाठी काम करणार - शरद पवार

Sharad pawar criticize bjp on ED inquiry and farmers issue  Sharad pawar criticize bjp on ED inquiry and farmers issue

 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये सभा घेत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी ईडीचा मुद्दा उपस्थित करत, आमच्यावर खटले भरा नाहीतर आम्हाला तुरुंगात टाका. सामान्य जनता, शेतकरी व कामगार यांचं काम करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तर शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीला जबाबदार भाजपाला मत न देण्याचं थेट आवाहनही त्यांनी केलं.

(हेही वाचा...सत्तेत आल्यावर मोदींनी ओबीसी आयोगाची स्थापना केली - अमित शहा)

दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रचारसभांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पवार आपल्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार करत आहेत. गेल्या काही दिवसांत पवार हे ईडी सक्तवसुली संचालनालयामुळे (ईडी) चर्चेत आले होते. हा मुद्दा उचलत त्यांनी भाजपाला धारेवर धरलं. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर खोटे आरोप केले आणि त्यांना तुरुंगात टाकलं. तर आता माझ्यापर्यंत आले आहेत. काय वाटेल ते करा, आमच्यावर खटले भरा किंवा तुरुंगात टाका. सामान्य जनता, शेतकरी, कामगारांचं नेहमी काम करत राहणार, अशी भूमिका त्यांनी मांडली.

भाजपाला दारातही उभं करू नका

पवार यांनी ईडीसोबतच सध्या कांदा उत्पादकांवर आलेल्या संक्रातीवर भाष्य केलं आहे. भाजपा सरकारला शेतीबाबत आस्था नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली. तेव्हा सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं असून त्यांना मतदानासाठी दारातही उभं करू नका, असं थेट आवाहन त्यांनी नगरच्या मतदारांना केलं आहे. तसंच आपल्या सरकारच्या काळात आपण एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होतो. परंतु आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढल्या आहेत. तरीसुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही. तर सत्तेत आल्यावर अशा विमा कंपन्यांना धडा शिकवू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

(हेही वाचा...भागवतांच्या नेतृत्वात अनेक बॉम्बस्फोटात सहभागी, माजी प्रचारकाचे विधान)


web title : Sharad pawar criticize bjp on ED inquiry and farmers issue 


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “तुरुंगात टाकलं तरी जनतेसाठी काम करणार - शरद पवार”

Leave a reply