news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

नितेश राणे झाले 'दक्ष', पोचले संघाच्या कार्यक्रमात

Nitesh Rane attend Rashtriya Swayamsevak Sangh Dussehra Program, Discussion in the political circle Nitesh Rane attend Rashtriya Swayamsevak Sangh Dussehra Program, Discussion in the political circle

 

मूळचे शिवसैनिक, मधल्या काळात काँग्रेस आणि आता नुकतेच माजी मुख्यमंंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश भाजपावासी झाले. नितेश यांनी चक्क आज (मंगळवार) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. सोशल मीडियावर तर नितेश यांचा हा संघाच्या कार्यक्रमात बसलेला फोटो व्हायरल होत असून, त्यावर आता प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे देखील उपस्थित होते.

(हेही वाचा - जम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार; गुरुवारपासून पर्यटक आनंद लुटणार)

राणे पिता-पुत्रांआधी नितेश यांचा प्रवेश

नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश होता होता राहिलाय. मात्र त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांना भाजपाने तिकीट देत भाजपामध्ये प्रवेश दिला. त्यामुळे राणे आणि निलेश राणे यांच्या आधी नितेश भाजपावासी झाले. दरम्यान, जमसंड येथे दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विजयादशमीनिमित्त संचलन केले जाते. मात्र यावेळी त्यांची उपस्थितीची चर्चा झाली.

नितेश कणकवलीतून भाजपाचे उमेदवार

दरम्यान, कणकवली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे नितेश हे यंदा भाजपामधून निवडणूक लढवत आहेत. तसेच त्यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे देखील आव्हान आहे. एवढेच नाही तर भाजपाच्या संदेश पारकर यांनी देखील सतीश सावंत यांना पाठिंबा दिला असून, नितेश यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे नितेश हे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय म्हणून की काय एरव्ही संघाला विरोध करणारे नितेश आज संघाच्या कार्यक्रमात दिसले.

 

web title - Nitesh Rane attend Rashtriya Swayamsevak Sangh Dussehra Program, Discussion in the political circle


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “नितेश राणे झाले 'दक्ष', पोचले संघाच्या कार्यक्रमात”

Leave a reply