news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

सत्तेत आल्यावर मोदींनी ओबीसी आयोगाची स्थापना केली - अमित शहा

 BJP leader amit shah on bhagwangad for Dussehra melava BJP leader amit shah on bhagwangad for Dussehra melava

 

बीड जिल्ह्यातील भगवानबाबा यांच्या जन्मगावी दसरा मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दाखल झाले आहेत. शहा यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे बीडसह परळीला छावणीचे स्वरुप आले आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यामुळे विरोधकांना चांगलीच धडकी भरणार असल्याचं म्हटलं जातंय. भाजपाच्या प्रचाराचा हा शुभारंभ मानला जात आहे.

दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंनी भगवान भक्तीगडावरून सुरू ठेवली आहे. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, आपल्या सर्व जणांना एकत्र करण्याची शक्ती म्हणजे राष्ट्रभक्ती. देशाच्या हितासाठी धाडसी निर्णय घेणाऱ्या अमित शहांनी 370 कलम हटवून न्याय दिला. त्यामुळे त्यांना 370 ध्वजांची सलामी देण्यात आली. भक्तांची गर्दी भविष्याची दिशा बदलेल, मतांसोबत मनंही जिंकायचं आहे, अशा शब्दात त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. अमित शहांच्या नेतृत्वात सीमोल्लंघन करायचं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जे काम केलं ते पुढे सुरु ठेवायचं आहे. माझ्या भावांना कोयता उचलण्याची वेळ येऊ नये, असं कार्य करायचं आहे. आज माझ्या संघर्षाने मला तुम्ही कौतुकाची थाप दिली. शेवटपर्यंत तुमचा स्वाभिमान अन् सन्मानासाठी काम करायचं आहे, असं त्यांनी सांगितले.

तुमच्या मनात गोपीनाथ मुंडे आहे, तुमच्या दारात सेवा यावी यासाठी कार्य करायचं आहे. तुमची सेवा करण्याचं काम मला नेतृत्वाने दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते. 4 वर्षापूर्वी अहंकराचा गड उतरून नवी सुरुवात केली. तुमच्या उपस्थितीतने मला शाबासकी मिळाली आहे, नेतृत्वाची शाबासकी मिळणं हे मोठं भाग्य आहे. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी काम केलं. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केलं, असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या कामांचं तोंडभरुन कौतुक

अमित शहांनी कलम 370 हटविण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. ते म्हणाले, कलम 370 हटवून संपूर्ण देशाला एक केलं. तुम्ही 300 जागा दिल्या मोदींनी 370 कलम हटवलं. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. 70 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या गोष्टी मोदींनी पूर्ण केल्या. पंतप्रधान मोदींचं सरकार वंचितांसाठी काम करत आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. मोदींनी ओबीसीसाठी आयोगाची स्थापना केली. कलम 370 हटविण्याला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा. मोदींचे कार्य घराघरापर्यंत पोहचवा असं आवाहनही यावेळी अमित शहांनी केलं.

भगवानबाबांनी समाजासाठी आयुष्य वेचलं. त्यांनी समाजाला शिक्षणाचा संदेश दिला. शिक्षणातून आयुष्याला दिशा मिळू शकते, याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. त्याओबीसी, वंचितांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेलं काम अतिशय मोठं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे भगवानबाबांच्या विचारांनी जगले. त्यांनी ऊसतोड कामगार, मजुरांचे प्रश्न मार्गी लावले. आता त्यांच्या कन्या पंकजा मुंडेदेखील त्याच मार्गानं वाटचाल करत आहेत,' असं शहा म्हणाले.

 

सावरगावातील भाषणाचे काही मुद्दे

- भगवान गडावर अमित शहांना ३७० तोफांची सलामी

- अमित शहा यांना भगवान बाबा यांच्यासारखा फेटा बांधण्यात आला आहे. 

- अमित शहा आणि हरिभाऊ बागडे यांना ज्ञानेश्वरी आणि भगवान बाबा यांची मुर्ती देऊन सत्कार

- भाजपाच्या प्रचाराचा हा शुभारंभ मानला जात आहे

पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात 

- अमित शहा यांच्या नेतृत्वात सीमोल्लंघन करायचं

- अमित शहांनी ३७० कलम हटवून न्याय दिलाय

- ३७० ध्वज दाखवून अमित शहांच स्वागत
- गोपीनाथ मुडेंनी सुरू केलेल काम पुढे न्यायचं आहे
- भगवान बाबांनी सर्वांना शिक्षणाचा विचार दिला

- ही भक्तांची गर्दी दिशा बदलणार

- माझ्या भावांना कोयता हाती घेण्याची वेळ येऊ नये

- ४ वर्षांपूर्वी अहंकाराचा गड उतरुन नवी सुरुवात

- शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा स्वाभिमान टिकवणार

- मुंडे साहेबांनी स्वता: च्या हाडांची काडं केली
- नेतृत्वाची शाबासकी मिळणं मोठ भाग्य - पंकजा मुंडे

 अमित शहा यांच्या भाषणाला सुरुवात

- शिक्षणातून विकासाचा मार्ग मिळेल, अशी बाबांची शिकवण

- ऊसतोड आणि साखर कारखान्यातील कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंकजा मुंडे कटिबद्ध आहेत.

- गोपीनाथ मुंडे यांना भगवान बाबांच्या शिकवणीच्या मार्गावर काम केलं. त्याच मार्गावर आता पंकजा मुंडे काम करत आहेत. 

- तुम्ही ३०० जागा दिल्या मोदींनी ३७० कलम हटवलं

- कलम ३७० हटवून मोदींनी देश एक केला 

- कलम ३७० रद्द झाल्यानं काश्मीरला भारतात समाविष्ट करुन घेता आलं

- सत्तेत आल्यापासून ओबीसी, वंचित समाजासाठी मोदी सरकारनं काम केलंय

- पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतर मोदींनी इथे ओबीसी आयोगाची स्थापना केली

- मोदींनी ओबीसींना घटनात्मक दर्जा दिला

- मोदींच काम प्रत्येक घरापर्यंत पोहचवा

- ७० वर्षांपासून प्रलंबित कामं मोदींनी केली 

- दसऱ्यानिमित्त आणि निवडणुकीच्या तोंडावर मी ओबीसी आणि वंचितांच्या समोर आलो, ही भगवान बाबांचीच कृपा

 

  

 

Web title - BJP leader amit shah on bhagwangad for Dussehra melava


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “सत्तेत आल्यावर मोदींनी ओबीसी आयोगाची स्थापना केली - अमित शहा ”

Leave a reply