news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

आजोबा उतरले निवडणुकीच्या आखाड्यात

80 years old vishnu kumbhar will contest vidhan sabha election 80 years old vishnu kumbhar will contest vidhan sabha election

 

विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार संपूर्ण ताकदीने रिंगणात उतरवले आहेत. राज्यभरातून २८ मतदारसंघात सुमारे ४ हजार ७३९ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

८० वर्षांचे आजोबा निवडणूक लढणार

प्रत्येक उमेदवाराची आपापली खास बात आहे. पण, या सगळ्यात आपलं वेगळेपण सिद्ध केले आहे ते कोल्हापूरच्या परिते इथल्या माढा गावातील विष्णू कृष्णा कुंभार यांनी. अपक्ष म्हणून अर्ज भरलेले विष्णू कुंभार यांचे वय ८० वर्षे असून, ही त्यांची तिसरी निवडणूक आहे.

(हेही वाचा - भारतात ठळकपणे दिसत आहेत जागतिक मंदीचे परिणाम – आयएमएफ प्रमुख)

विष्णू कृष्णा कुंभार हे वारकरी संप्रदायाचे आहेत. भजन-कीर्तन सादर करून ते आपली उपजीविका करतात. या सर्वातून मिळणार पैसा साठवून त्यांनी आतापर्यंत दोन वेळा निवडणूक लढवली आहे. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उभे असताना त्यांच्याविरोधात कुंभार यांनी निवडणूक लढविली होती. याशिवाय माढा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विनायक पाटील यांच्या विरोधातदेखील कुंभार यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.

ही त्यांची तिसरी निवडणूक आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे ते आवर्जून सांगतात. या वयात त्यांनी निवडणूक लढवू नये, असे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सांगितले, मात्र तरीही त्यांना न जुमानता कुंभार यांनी यंदाही विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला आहे.

(हेही वाचा...पुण्यात पावसाचं तांडव; राज ठाकरेंच्या पहिल्या सभेवर 'पाणी')

कुंभार यांचा विजय होवो अथवा न होवो, पण त्यांच्या जिद्दीला सलाम करावा तेवढा कमीच. संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या अधिकारात देशातला कोणताही नागरिक कुठूनही निवडणूक लढवू शकतो. सर्वसामान्य माणूसदेखील निवडणूक प्रक्रियेत सक्रिय यावा आणि पक्षांतर्गत राजकारण संपायला हवे, हा संदेश देण्यासाठी विष्णू कुंभार निवडणूक लढवतात, असे सांगितले जाते.

Web title - 80 years old vishnu kumbhar will contest vidhan sabha election0 Response(s) to “आजोबा उतरले निवडणुकीच्या आखाड्यात”

Leave a reply