news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

जिओची 'ही' सेवा बंद; ग्राहकांना बसणार भुर्दंड

Reliance Jio To Charge For Voice Calls Reliance Jio To Charge For Voice Calls

 

तुमच्याकडे रिलायन्स जिओ असेल आणि तुम्ही दुसऱ्या नेटवर्कवर फोन करणार असाल तर तुम्हाला आता पैसे मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत रिलायन्स जिओवर व्हॉईस कॉलिंग फ्री होते. फक्त इंटरनेट पॅक रिचार्ज करण्याचे पैसे भरावे लागत होते, मात्र आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.

आता जिओ आकारणार पैसे

जर तुम्हाला प्रतिस्पर्धी कंपनीच्या फोन नेटवर्कवर व्हॉईस कॉल करायचा असेल तर रिलायन्स जिओ प्रतिमिनिटासाठी ६ पैसे आकारणार आहे. रिलायन्स जिओकडून बुधवारी ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आतापर्यंत पूर्णपणे फ्री असलेली व्हॉईस कॉलिंगची सुविधा संपुष्टात आली आहे.

रिलायन्स जिओ पैसे आकारण्याच्या मोबदल्यात ग्राहकांना तितक्याच किमतीचा फ्री डाटा देणार आहे. जिओच्या मोबाईल ग्राहकांनी प्रतिस्पर्धी कंपनीच्या नेटवर्कवर फोन केल्यास जिओला त्या कंपनीला पैसे द्यावे लागतात. हे जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत प्रतिमिनिटासाठी ६ पैसे भरावे लागतील, असे जिओकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा...मुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय?)

जिओ ग्राहकांनी दुसऱ्या जिओ मोबाईल, लँडलाईन, व्हॉट्स अॅप,  फेस टाइमवर फोन केल्यास हे पैसे आकारले जाणार नाहीत. सर्व नेटवर्कचे इनकमिंग कॉल पूर्णपणे मोफत असतील. त्यावर कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, असे जिओने स्पष्ट केले आहे.

का घेतला असा निर्णय?

दूरसंचार क्षेत्राचे नियमन करणाऱ्या ट्रायने २०१७ मध्ये इंटरकनेक्ट युसेज चार्ज प्रतिमिनीट १४ पैशांवरून ६ पैशांवर आणला होता. जानेवारी २०२० पर्यंत हा चार्ज बंद करण्याचे ट्रायचे उद्दिष्ट्य होते. जिओ नेटवर्कवर व्हॉइस कॉल्स पूर्णपणे मोफत असल्यामुळे आतापर्यंत कंपनीला भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया कंपन्यांना १३,५०० कोटी रुपये भरावे लागले.

web title : Reliance Jio To Charge For Voice Calls0 Response(s) to “जिओची 'ही' सेवा बंद; ग्राहकांना बसणार भुर्दंड”

Leave a reply