news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

पुण्यात पावसाचं तांडव; राज ठाकरेंच्या पहिल्या सभेवर 'पाणी'

MNS leader Raj Thackerays pune first rally canceled due to rain MNS leader Raj Thackerays pune first rally canceled due to rain

 

राज ठाकरे

पुण्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. बुधवारी मनसेच्या प्रचाराचा नारळ पुण्यात फुटणार होता. मात्र या सभेवर पावसाने पाणी फेरलं आहे. ईडीनं केलेल्या चौकशीनंतर आपल्या पहिल्या प्रचारसभेत राज ठाकरे नेमकं बोलणार काय, याकडे सर्वांचच लक्ष होतं. पण, सभा सुरू होण्यापूर्वी पाऊस सुरू झाल्यामुळे ही सभा रद्द करावी लागली आहे.

हेही वाचा - भारतात ठळकपणे दिसत आहेत जागतिक मंदीचे परिणाम – आयएमएफ प्रमुख

पावसाचा तडाखा 

पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचं तांडव सुरूच आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यावर पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. या पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. कोथरुड, सिंहगड रस्ता, कात्रज, धनकवडी, स्वारगेट आणि शहराच्या मध्यवस्ती भागात पावसाचा जोर अधिक होता.

वेधशाळेच्या माहितीनुसार, पुण्यावर 15 किमी उंचीचे ढग आहेत. त्यामुळे कमी वेळेत मोठा पाऊस शक्य आहे. त्यामुळे काही भागात गारपीटही झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत व पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील काही भागांत पुढील चार दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पहिली सभा रद्द

पुण्यातील सरस्वती विद्यामंदिराच्या मैदानात राज ठाकरे यांना सभेसाठी जागा मिळाली होती. बुधवारी सायंकाळी या ठिकाणी राज यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, नेमका याच वेळी पाऊस सुरू झाल्याने राज यांची सभा रद्द करावी लागली आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळं मैदानात पाणी साचलं होतं. बुधवारी पाऊस उघडला होता. सकाळपासून मनसेचे कार्यकर्ते सभेच्या तयारीला लागले होते. मात्र संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं राज ठाकरेंच्या सभेवर पाणी पडलं.

 

 

Web title - MNS leader Raj Thackerays pune first rally canceled due to rain0 Response(s) to “पुण्यात पावसाचं तांडव; राज ठाकरेंच्या पहिल्या सभेवर 'पाणी' ”

Leave a reply