news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

राज्यातलं पहिलं सिंगल युज प्लास्टिकमुक्त सरकारी कार्यालय; कुठे आहे?

Oval Majivada Assembly Constituency Election Office has been declared as the first single use plastic free election office in the state. Oval Majivada Assembly Constituency Election Office has been declared as the first single use plastic free election office in the state.
 
प्लास्टिकचा वापर बंद करा यासाठी ठाणे महानगरपालिका नेहमीच जागरूक असते, याचा प्रत्यय निवडणूक कार्यालयात बघायला मिळाला. ठाणे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी एकदाच वापर करून फेकून देणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करणारे १४६ ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय हे राज्यातील पहिले सिंगल युज प्लास्टिकमुक्त निवडणूक कार्यालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील पहिलं निवडणूक कार्यालय

ठाणे विधानसभा मतदारसंघात स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, यंदा प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांनीदेखील मतदान करावे, यासोबतच एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी १४६ विधानसभा मतदारसंघांत साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चारुशीला पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
 

तरुणांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या जनजागृती मोहिमेला तरुणांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले प्लास्टिकमुक्त निवडणूक निर्णय कार्यालय म्हणून ओवळा माजीवडा विधानसभा निवडणूक निर्णय कार्यालय घोषित करण्यात आले आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, डॉ. चारुशीला पंडित, डॉ. अनुराधा बाबर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
 
web title : Oval Majivada Assembly Constituency Election Office has been declared as the first single use plastic free election office in the state.


0 Response(s) to “राज्यातलं पहिलं सिंगल युज प्लास्टिकमुक्त सरकारी कार्यालय; कुठे आहे?”

Leave a reply