news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

भारतात ठळकपणे दिसत आहेत जागतिक मंदीचे परिणाम – आयएमएफ प्रमुख

global economic slowdowns effects are more pronounced in india says imf chief global economic slowdowns effects are more pronounced in india says imf chief

 

जागतिक पातळीवर अनेक देशांना समकालीन मंदीचा फटका बसला आहे. पण, भारतात या मंदीचे परिणाम ठळकपणे दिसून येत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर 90 टक्के जगाला या घटत्या विकासदराचा सामना करावा लागेल, असं विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टालीना जॉर्जिव्हा यांनी केलं आहे.

ख्रिस्टालीना जॉर्जिव्हा यांनी मंगळवारी आयएमएफच्या एमडी पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आपल्या पहिल्या भाषणात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 2 वर्षांपूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती पाहायला मिळाळी होती. जगाचा 75 टक्के भाग विकसाच्या दिशेने वाटचाल करत होता. आता जागतिक अर्थव्यवस्थेवर समकालिक मंदीचे सावट आहे. 90 टक्के जगाला मंदीचा सामना करावा लागू शकतो असा आमचा अंदाज असल्याचं त्या म्हणाल्या.

हेही वाचा - कोथरूड - पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ

याचाच एक भाग म्हणून जर्मनीत बेरोजगारी वाढली आहे. अमेरिका, जपान आणि प्रामुख्याने युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंद स्थिती पाहायला मिळाली आहे. पण, भारत आणि ब्राझील या सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये यावर्षी मंदीचा परिणाम अधिक ठळकपणे दिसून येत असल्याचं जॉर्जिव्हा यांनी नमूद केले.

भारतात वाहन उद्योगासह अन्य क्षेत्रांमध्ये मंदीचे परिणाम दिसत आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. पण त्याचा अपेक्षित परिणाम अजून दिसलेला नाही.

 

Web title - global economic slowdowns effects are more pronounced in india says imf chief0 Response(s) to “भारतात ठळकपणे दिसत आहेत जागतिक मंदीचे परिणाम – आयएमएफ प्रमुख”

Leave a reply