news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे काळाच्या पडद्याआड

veteran theater artist arun kakde passed away veteran theater artist arun kakde passed away

 

'अविष्कार' नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ व ९४व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं दुपारी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 

(हेही वाचा...भारतात ठळकपणे दिसत आहेत जागतिक मंदीचे परिणाम – आयएमएफ प्रमुख)

काकडे यांनी साठहून अधिक वर्षे रंगभूमीवर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांचं 'अमका' हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं होतं. रंगभूमीवरील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्कराने सन्मानित करण्यात आलं होतं. अशा या रंगकर्मींचा निधनानंतर समांतर रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.   

 (हेही वाचा...पिळगांवकरांची सन्मानचिन्हे परत मिळण्याची आशा धूसर)

काकडे यांच्याबद्दल थोडक्यात 

काकडे यांनी आपल्या करिअरला पुण्यातून सुरुवात केली. सुरुवातीला विजय मेहता, अरविंद देशपांडे, विजय तेंडूलकर, माधव वाटवे या त्या काळच्या तरुण रंगकर्मींसह त्यांनी 'रंगायन' ही संस्था सुरू केली. मात्र कालांतराने या संस्थेत फूट पडली. त्यानंतर १९७१मध्ये 'आविष्कार' ही नवी नाट्यसंस्था स्थापन करण्यात आली. तेव्हापासून काकडे यांना 'अविष्कार' या संस्थेसोबत जोडलं जात आहे. आविष्काराने छबिलदास चळवळ उभी केली. या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. तर रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून पुढे आले. वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या काकडेंनी त्याचवर्षी १२ महिन्यांत १२ नाटकं रंगभूमीवर आणली होती.   

web title : veteran theater artist arun kakde passed away 0 Response(s) to “ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे काळाच्या पडद्याआड”

Leave a reply