news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ

 central government employees dearness allowance hiked by 5 to benefit 50 lakh government employees 65 lakh pensioners central government employees dearness allowance hiked by 5 to benefit 50 lakh government employees 65 lakh pensioners


ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठी गिफ्ट दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात पाच टक्के वाढ केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. १ जुलैपासून ही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचारी आमि ६५ लाख निवृत्तिवेतनधारकांना होणार आहे. 

(हेही वाचा...भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा; कॉम्पिटिटीव्ह इकॉनॉमीत ६८व्या स्थानावर)

सरकारच्या तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा बोजा

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे. वाढीव भत्ता जुलै २०१९ पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

शेअर बाजारात झळाळी

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे शेअर बाजारात झळाळी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ६४६ अंकांनी वधारला असून ३८,१७८ अंकांवर बंद झाला, निफ्टीही १८७ अंकांची वाढ नोंदवून ११,३१३ वर स्थिरावला.

 

महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली असतानाच, या निर्णयामुळं शेअर बाजारात झळाळी आल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स ६४६ अंकांनी वधारला असून, ३८,१७८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीही १८७ अंकांची वाढ नोंदवून ११, ३१३वर स्थिरावला.

web title : diwali gift to central government employees dearness allowance hiked by 5 to benefit 50 lakh government employees 65 lakh pensioners.
0 Response(s) to “केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट, महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ”

Leave a reply