news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

७४ वर्षांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बाॅम्ब निकामी करताना स्फोट, दोघे ठार

second world war bomb explodes in Poland after 74 years, two soldiers dead second world war bomb explodes in Poland after 74 years, two soldiers dead

 

जपान आणि चीन यांच्यात सर्वाधिक दिवस झालेल्या दुसऱ्या विश्व युद्धादरम्यान वापरण्यात आलेल्या एका बाॅम्बचा मंगळवारी पोलंडमध्ये स्फोट झाला. यात दुर्घटनेत दोन सैनिक ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ७४ वर्षांपूर्वी दुसरे महायुद्धात वापरण्यात आलेला बाॅम्ब निकामी करण्याचे काम हे सैनिक करत होते.

(हेही वाचा - भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा; कॉम्पिटिटीव्ह इकॉनॉमीत ६८व्या स्थानावर)

पोलंडच्या कुजनिया रासिबोर्सकानजीकच्या जंगलात ही दुर्घटना घडली. जखमी झालेल्या सैनिकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. सर्व सैनिक पॅराशूट रेजिमेंटचे सदस्य होते. त्यांना जंगल परिसरात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. सैनिकांना स्थानिकांकडून काही हत्यारे आणि बाॅम्ब दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सैनिकांनी ती हत्यारे ताब्यात घेतली. त्यात सापडलेले बाॅम्ब निकामी करण्याचा प्रयत्न करताना स्फोट झाला.

कधी झाले होते दुसरे महायुद्ध

७ जुलै १९३७ रोजी या युद्धाची सुरुवात झाली होती. मार्को पोलो पुलावर याच दिवशी एक अपघात झाला होता. त्यानंतर जपान आणि वाईना दरम्यान सर्वाधिक दिवस हे युद्ध चालले. १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडमध्ये घुसखोरी केली. ज्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स यांनी हिटलरच्या नाजी राज्यासोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला. जपानने सप्टेंबर १९४५ मध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर हे युद्ध थांबले.

 

web title - second world war bomb explodes in Poland after 74 years, two soldiers dead0 Response(s) to “७४ वर्षांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बाॅम्ब निकामी करताना स्फोट, दोघे ठार”

Leave a reply