news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा; कॉम्पिटिटीव्ह इकॉनॉमीत ६८व्या स्थानावर

Indian economy on 68th rank in competitive economy Indian economy on 68th rank in competitive economy

 

एकीकडे देशातील आर्थिक स्थिती खालावलेली असताना आर्थिक आघाडीवरूनही भारताची घसरण होत असल्याची महत्त्वाची बाब समोर आली आहे. जगातील कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमी म्हणजे स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था थेट ६८व्या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची १० स्थानांनी घसरण झाली असून ही चिंतेची बाब असल्याचं बोललं जात आहे.

(हेही वाचा...'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम)

देशाच्या अर्थव्यवस्थेची यंदा खराब कामगिरी

यंदा भारत हा ब्राझीलसह ब्रिक्स देशांमध्ये सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश ठरला आहे. आघाडीच्या क्रमवारीत ब्राझीलला ७१ वे स्थान मिळालं आहे. तर यावेळी अमेरिकेऐवजी सिंगापूरने अव्वल स्थान गाठलं आहे. चीनसोबत सुरू असलेल्या व्यापारी युद्धाचा फटका हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला असल्याचं समजत आहे. दरम्यान, याआधीच्या आर्थिक आघाडीवर लक्ष वेधले असता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रसिद्ध केलेल्या नव्या क्रमवारीपूर्वी भारताचा जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक ५८व्या स्थानावर होता. 

कॉर्पोरेट गव्हर्नन्ससह इतर गोष्टींत भारताची चांगली क्रमवारी  

कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमीच्या क्रमवारीत भारताची घसरण झाली असली तरी कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये भारत १५व्या स्थानावर आहे. यासह शेअर होल्डर गव्हर्नन्समध्येही भारताला दुसरं स्थान देण्यात आलं आहे. मार्केट साईज व अक्षय ऊर्जेच्याबाबतीत भारताला तिसरं स्थान देण्यात आलं आहे. यासोबतच बाजारातील अनेक नव्या गोष्टींच्या बाबतीत इतरांपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेला वरचं स्थान देण्यात आलं आहे.    

आयुर्मानाच्या क्रमवारीत भारताचं स्थान खाली 

आयुर्मानाच्या क्रमवारीत भारताचं स्थान १०९व्या स्थानावर आहे. यामध्ये एकूण १४४ देशांचा समावेश असून भारत १०९व्या स्थानावर आहे. दक्षिण आशियाई देशांशी तुलना केल्यास भारताचं हे स्थान खूप खाली आहे. तर आफ्रिका खंडाबाहेरील देशांचीही तुलना केल्यास भारताचं हे स्थान योग्य नसल्याचं बोललं जात आहे.  

(हेही वाचा...काळा पैसा येणार बाहेर, स्विस बॅंकेतील खात्यांचे धागेदोरे मिळू लागले...)

web title : Indian economy on 68th rank in competitive economy   

 

 0 Response(s) to “भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा; कॉम्पिटिटीव्ह इकॉनॉमीत ६८व्या स्थानावर”

Leave a reply