news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

भारताचं पहिलं लढाऊ विमान, पॅरिसमध्ये 'राफेलास्त्रा'ची पूजा

Defence Minister Rajnath Singh receives first Rafale jet for IAF Defence Minister Rajnath Singh receives first Rafale jet for IAF

 

भारतीय हवाई दलाला आपले पहिले राफेल लढाऊ विमान मिळाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: जाऊन हे विमान आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी राफेलची भारतीय परंपरेनुसार पूजा केली. त्यांनी राफेल विमानावर कुंकवाने ओम काढले आणि त्यावर झेंडुची फुले आणि श्रीफळ अर्पण केले. 

यंदाचा दसरा हा भारतासाठी फारच खास ठरला आहे. आपल्याकडे दसऱ्याला शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. हेच औचित्य साधून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मेरीनेकच्या हवाई तळावर युनिटची पाहणी केली. त्यांच्या हस्ते राफेलचे शस्त्रपूजन होणार आहे. त्यानंतर राजनाथ सिंह राफेलमधून उड्डाणही करणार आहेत. हे विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या पथकाला फ्रान्सकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, फ्रान्समध्ये आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार. आजचा दिवस फ्रान्स आणि भारतासाठी महत्त्वाचा आहे. विजयादशमी, भारतीय हवाई दलाचा वर्धापन दिन आणि राफेल विमाने हवाई दलात समाविष्ट होणे, हा उत्तम योग. यामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता वाढेल. भारतीय सुरक्षा दलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि महत्त्वाचा ठरला आहे. राफेल फ्रेंच शब्द असून, त्याचा अर्थ 'वादळ' असा होतो, हे मला सांगण्यात आलं आहे. नावाप्रमाणे हे लढाऊ विमान आपली ताकद सिद्ध करेल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

भारत आणि फ्रान्स नेहमी एकमेकांना सशक्त साथ देणारे देश आहेत. दोन्ही देशांतील संबंध असेच वृद्धिंगत व्हावेत. इंडो-फ्रेंच द्विपक्षीय संरक्षण संबंधांसाठी आजचा महत्त्वाचा दिवस ठरल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार!

 

पहिले राफेल विमान आणण्यासाठी राजनाथ सिंह हे फ्रान्सला गेले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर पॅरिसमध्येच राफेल विमानाची पूजा देखील करणार आहेत. यामुळे भारतीय हवाई दलाला दसऱ्याची खास भेट मिळाली आहे. 

हिंदू संस्कृतीनुसार दसऱ्याच्या दिवशी घरातील लक्ष्मी व शस्त्रांची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्याचे पालन करून दरवर्षी राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राचीन - नवीन शस्त्रांची पूजा करतात.

दरम्यान, राजनाथ सिंह हे गृहमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असताना दरवर्षी शस्त्रपूजा करत होते. यंदा पहिल्यांदाच संरक्षण मंत्री म्हणून शस्त्रपूजा करणार आहे. या निमित्ताने राजनाथ सिंह हे फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युल मॅक्रोन यांची देखील भेट घेतली आहे. त्यानंतर बॉर्डेक्स येथे जाऊन त्यांनी राफेल विमान स्वीकारले.

काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल आर के एस. भादुरीया यांनी पत्रकार परिषदेत मे 2020 पर्यंत राफेलच्या 36 विमानांची डिलिव्हरी भारताकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. तसेच भारतीय हवाई मार्गाने मे २०२० मध्येच पहिल्यांदा राफेल उड्डाण घेऊ शकते.

राफेल विमानात हे सहा बदल होणार


इस्रायली हेल्मेटट माऊंटेड डिस्प्ले
रडार वॉर्निंग रिसिव्हर्स
लो बॅण्ड जॅमर्स
10 तासांचा फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग सिस्टम
इन्फ्रा-रेड सर्च
ट्रॅकिंग सिस्टम

राफेल विमानाची वैशिष्ट्ये


1. राफेलला प्रत्येत मोहिमेवर पाठवता येऊ शकते.
2. 60 हजार फुटांपर्यंत हे विमान उड्डाण करू शकतं. तसंच याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.
3. मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही हे विमान ओळखलं जातं. तसंच वेगवेगळ्या हवामानात हे विमान काम करू शकतं.
4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.
5. राफेलची मारक क्षमता 3 हजार 700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.
6. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.
7. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.
8. राफेल विमान 24 हजार 500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.

 

Web title - Defence Minister Rajnath Singh receives first Rafale jet for IAF0 Response(s) to “भारताचं पहिलं लढाऊ विमान, पॅरिसमध्ये 'राफेलास्त्रा'ची पूजा”

Leave a reply