news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

भागवतांच्या नेतृत्वात अनेक बॉम्बस्फोटात सहभागी, माजी प्रचारकाचे विधान

I participated in many bomb blasts under the leadership of Mohan Bhagwat - p. vijya shnkar reddy     I participated in many bomb blasts under the leadership of Mohan Bhagwat - p. vijya shnkar reddy

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो, असं खळबळजनक विधान संघाच्या माजी प्रचारकाने केले आहे. आंध्र प्रदेशातील संघाचे माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. त्यांच्या या विधानाने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 

(हेही वाचा...दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रचारसभांचा धुरळा; पंतप्रधानांसह 'या' दिग्गज नेत्यांच्या सभा)

नेमकं काय म्हणाले रेड्डी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. सरसंघचालक भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. मी १२ वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केलं. या दरम्यान अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या असून मला त्याची जाणीव झाली व मी संघाची साथ सोडली. संघाने आजवर देशभक्तीच्या नावे आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हातातून अनेकांचे बळी गेले आहेत. बॉम्बस्फोटासारख्या कृत्यात मी संघाच्यासोबत होतो. यासंदर्भातील सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत. म्हणूनच संघाने माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्लाही केला आहे.

संघाचा हा काळा चेहरा समोर आणण्यासाठी मी 'देशभक्त के नाम पर आरएसएस के काले कारनामे' असं पुस्तकही काढलं आहे. संघाचे हे कार्य सहन न झालेल्या काहींनी विष पिऊन तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. असेच निराशा झालेले काही प्रचारक माझ्यासोबत असून लवकरच त्यांना घेऊन मी दिल्लीला जाणार आहे. तर यावेळी संघातील अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा खुलासा आपण करणार असून भागवतांशी समोरा-समोर चर्चा करायला तयार आहोत, असं रेड्डी म्हणाले.

(हेही वाचा...राजभवनात राज्य राखीव दलाच्या जवानाने झाडली स्वतःवर गोळी)

दरम्यान, नुकत्याच झालेल्या संघाच्या दसरा निमित्तच्या कार्यक्रमात मोहन भागवत हे हिंदू मुस्लिम ऐक्य, झुंडबळीला विरोध आदींवर भाष्य करत होते. तर रेड्डी यांनी केलेले हे आरोप धक्कादायक असून त्यावर संघ काय प्रतिक्रिया देईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसंच रेड्डी दिल्लीत पोहोचल्यावर संघातील कोणत्या बड्या नेत्यांची नावं घेतील यावर आता चर्चा रंगली आहे. 

web title : I participated in many bomb blasts under the leadership of RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat says P. vijya shankar reddy0 Response(s) to “भागवतांच्या नेतृत्वात अनेक बॉम्बस्फोटात सहभागी, माजी प्रचारकाचे विधान”

Leave a reply