news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

हिंदूंचे संघटन म्हणजे मुस्लिमांचा विरोध नाही - मोहन भागवत

The union of Hindus is not opposed to Muslims says rss chief mohan bhagwat The union of Hindus is not opposed to Muslims says rss chief mohan bhagwat

 

हिंदूंचे संघटन करणे म्हणजे मुस्लिमांचा विरोध नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. केंद्र सरकारने हटवलेल्या कलम ३७०वर बोलताना त्यांनी हे विधान केलं. नागपुरातील रेशीमबाग येथे संघाच्या मुख्यालयात दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माझी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी हजेरी लावली होती. यावेळी मोहन भागवत यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ते झुंडबळी, ३७० कलम, चांद्रयान मोहीम, आर्थिक मंदी आदींवर त्यांनी भाष्य केलं.    

मोदी सरकारमध्ये धाडसी निर्णय घेण्याची क्षमता 

भागवत यांनी कलम ३७० वर भाष्य करत मोदी सरकारचे कौतुक केले आहे. हा निर्णय केवळ एकट्या सरकारने घेतला नसून त्याला इतर राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. असे धाडसी निर्णय घेण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे. तर ३७० कलम हटवून या सरकारने आपली कटिबद्धता दाखवली आहे. यासह काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झाले पाहिजे. तर तिथेही रोजगार निर्मिती केली पाहिजे. केवळ हिंदूंचे संघटन करणे म्हणजे मुस्लिमांचा विरोध नाही, असंही त्यांनी नमूद केलं.  

आर्थिक मंदीवर फार चर्चा करू नका

आर्थिक मंदीविषयी बोलताना भागवत म्हणाले, आर्थिक मंदीची फार चर्चा केल्याने व्यापारी, व्यावसायिक बचावात्मक भूमिका घेतील. त्यामुळे ते फारशी गुंतवणूक करणार नाहीत. याचा परिणाम पुन्हा अर्थव्यवस्थेवर होईल. सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून यातून देश लवकरच बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

झुंडबळीत संघाचा समावेश नाही 

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात झुंडबळी या मुद्यावरही स्पष्टीकरण दिले. झुंडबळी सारख्या घटनांमध्ये संघाचा काहीही सहभाग नाही. झुंडबळी हे लहान मोठ्या गटांचे कृत्य असून, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर केवळ एका समाजाकडून अशा घटना घडत नाहीत. त्याउलटही असे प्रकार घडतात. तसंच 'लिंचिंग' हा शब्द भारतातील नसून तो बाहेरून आला, असं ते यावेळी म्हणाले.

 

 

 

web title : The union of Hindus is not opposed to Muslims says rss chief mohan bhagwat0 Response(s) to “हिंदूंचे संघटन म्हणजे मुस्लिमांचा विरोध नाही - मोहन भागवत”

Leave a reply