news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

वायूसेना दिवस : बालाकोटच्या शौर्यासाठी वीर जवानांचा सन्मान

Indian Air force celebrates 87th anniversary  Indian Air force celebrates 87th anniversary

 

आज ८७वा वायुसेना दिवस आहे. यानिमित्त गाझियाबाद येथे हिंडन एअरबेसवर विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिनाचं औचित्य साधत बालाकोट एअर स्ट्राईक दरम्यान महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या वीरांचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे. विंग कमांडर अभिनंद वर्थमान यांच्यासह ५१ स्क्वाड्रनचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसंच ९व्या स्क्वाड्रनलाही युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.

 

लष्करप्रमुख बिपीन रावत, वायुसेना प्रमुख आर. के. सिंह भदौरिया आणि नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह आदी तीनही सेनाप्रमुखांनी यावेळी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली. तीनही सेनाप्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तर विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच लढाऊ हेलिकॅप्टर 'अपाचे' आणि ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर 'चिनूक' आदींचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं.    

राष्ट्रपती व पंतप्रधानांकडून शुभेच्छा 


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायुसेना दिनाच्या शुभेच्छा देत सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेननेची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार दरवर्षी या दिवशी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. वायूसेनेने सोशल मीडियावर पुलवामा हल्ला व एअर स्ट्राईकचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

 

web title : Indian Air force celebrates 87th anniversary 0 Response(s) to “वायूसेना दिवस : बालाकोटच्या शौर्यासाठी वीर जवानांचा सन्मान”

Leave a reply