news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

जम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार; गुरुवारपासून पर्यटक आनंद लुटणार

Tourism season to begin again in Jammu and Kashmir Tourism season to begin again in Jammu and Kashmir

 

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केल्यानंतर अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता राज्यपालांनी पर्यटनावरील निर्बंध हटवल्यामुळे जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजणार आहे. 

जम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटनाला सुरुवात होणार आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ट्रॅव्हल अडवायझरी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच हा आदेश १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपासून काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजणार आहे. महाष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटक जात असतात. त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला निर्णय आहे. कलम ३७० हटवण्याच्या अगोदरच्या आठवड्यात अमरनाथची यात्रा स्थगित करून सर्व पर्यटकांना तातडीने परत पाठवण्यात आले होते.

Tourists To Be Allowed In Jammu And Kashmir From Thursday

Tourists To Be Allowed In Jammu And Kashmir From Thursday

पर्यटनाचा मार्ग मोकळा

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर अनेक गोष्टींवर निर्बंध आले होते. तसेच जम्मू-काश्मीरमधील पर्यटनावरही निर्बंध होते, मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांची सोमवारी सल्लागार आणि मुख्य सचिव यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या ५ ऑगस्टपासून राज्यपाल दररोज ६ ते ८ वाजताच्या दरम्यान एक आढावा बैठक घेत आहेत.

(हेही वाचा...मुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय?)

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांतील निर्बंध हटवण्यात आले. यात माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रशासकीय सेवा, इंटरनेट यांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.

web title : Tourists To Be Allowed In Jammu And Kashmir From Thursday0 Response(s) to “जम्मू-काश्मीर पर्यटकांनी पुन्हा गजबजणार; गुरुवारपासून पर्यटक आनंद लुटणार”

Leave a reply