news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

The deadline for filing applications for CIDCO housing schemes has been extended till November 5. The deadline for filing applications for CIDCO housing schemes has been extended till November 5.

 

सिडको महामंडळातर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित ८१४ आणि महागृहनिर्माण योजनेतील ९२४९ घरांकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

सिडकोचे अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सिडकोतर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण आणि महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. या योजनांतील सर्व घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी आहेत. यापैकी ८१४ घरांच्या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ ऑक्टोबर २०१९ तर ९२४९ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ ऑक्टोबर २०१९ अशी होती. ८१४ घरांच्या गृहनिर्माण योजनेसाठी आतापर्यंत २७,३१० व ९२४९ घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी ४५ हजार 34 जणांनी अर्ज केले आहेत. दोन्ही गृहनिर्माण योजनांकरिता www.lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१९ तर अनामत रक्कम व अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर २०१९ ठरवण्यात आली आहे. या योजनांची सोडत 26 नोव्हेंबर 2019 रोजी काढण्यात येणार आहे.

(हेही वाचा...कांद्यामुळे शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'; एकाच दिवशी २५० ट्रॅक्टरची खरेदी)

असा भरा हप्ता

सिडको गृहनिर्माण योजना २०१८ मधील यशस्वी अर्जदारांना घरांच्या हफ्त्याची रक्कम भरण्याकरिता www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरायची आहे. डीडी अथवा धनादेश स्वीकारला जाणार नाही. ज्या अर्जदारांना तारण ना हरकत प्रमाणपत्राची (Mortgage NOC) आवश्यकता आहे अशा अर्जदारांसाठी सिडको निवारा केंद्राच्या www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. अर्जाची पडताळणी करून अर्जदारांनी नमूद केलेल्या बँकेच्या नावे डिजिटल स्वाक्षरीने तारण ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तारण ना हरकत प्रमाणपत्र अर्जदारांनी स्वत: डाऊनलोड करून बँकेत जमा करायचे आहे.

(हेही वाचा...सेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य)

प्रतीक्षा यादीतील अर्जदारांसाठी महत्त्वाचे 

प्रतीक्षा यादीतील ज्या ४१०२ अर्जदारांना नव्याने इरादापत्रे देण्यात आली आहेत त्यांनी प्रथम ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा सिडको निवारा केंद्राच्या www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर करायचा आहे. या अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने ७ ऑक्टोबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ऑनलाईन अपॉईंमेंट निश्चित करावी. त्यानंतर ठरलेल्या तारखेला आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी सिडको निवारा केंद्र, टॉवर नं. 10, आठवा मजला, सीबीडी बेलापूर या ठिकाणी भेट द्यावी. कागदपत्रांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान जे अर्जदार पात्र ठरतील, अशा अर्जदारांना त्यानंतर वाटपपत्रे देण्यात येतील, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. 

येथे संपर्क करा

याबाबत कुणाला काही शंका वा प्रश्न असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास संबंधित अर्जदारांनी सिडको निवारा केंद्रास भेट द्यावी अथवा ०२२-६२७२२२५० या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिडकोने केले आहे. 0 Response(s) to “सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्यास ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ”

Leave a reply