news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

उपवासाचे झटपट गुलाबजाम

Quick and easy sweet potato Gulab Jamun  Quick and easy sweet potato Gulab Jamun

सणासुदीला गोड पदार्थांचा घाट घातला जातो. मात्र दर वेळी वेगळे काय करावे हा प्रश्न पडतोच. करायला अत्यंत सोपे आणि झटपट असे गुलाबजाम करून पाहा. हे उपवासालाही चालतील.  

उपवासाचे झटपट गुलाबजाम 

साहित्य 

२ मोठी रताळी 

२-३ चमचे वरीचे अथवा शिंगाड्याचे पीठ  

अर्धी वाटी खवा 

तळण्यासाठी तूप अथवा शेंगदाणा तेल  

पाक करण्यासाठी 

१ वाटी साखर 

१ वाटी पाणी 

थोडेसे भिजवलेले केशर 

 हेही वाचा-दुर्गापूजा दर्शनावेळी राणी मुखर्जी झाली भावूक

कृती 

रताळी मऊ होईपर्यंत उकडून घ्या. साले काढा आणि किसून अथवा मॅश करून मळून घ्या. यात दोन चमचे वरीचे पीठ मिसळा. पुन्हा मळून घ्या. खवा मोडून किंचित परतून रताळ्याच्या गोळ्यात मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण तळहाताने भरपूर मळून मऊ आणि एकजीव करा.जितके मऊ होईल तितके चांगले. या गोळ्याचे लहान लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या.

तूप अथवा तेल गरम करून नंतर आच कमी करून हे गोळे अलगद तळून घ्या. सर्व बाजूंनी सोनेरी पिंगट रंग आल्यावर काढून घ्या. एका बाजूला पाक तयार करून घ्या. त्यासाठी एका कढईत वाटीभर साखर आणि तितकेच पाणी एकत्र करून मध्यम आचेवर साखर पूर्णतः विरघळेपर्यंत ढवळून घ्या. पाक फार घट्ट करू नये. यात भिजवलेले केशर घालून एकजीव करून घ्या. तळून घेतलेले गुलाबजाम या पाकात सोडून दहा मिनिटे राहू द्या. हलकेसे गरम अथवा थंड कसेही चांगले लागतात. 

टीप 

  • वरीचे पीठ फार जास्त वापरू नये. जितके कमी घालाल तितके चांगले, ते फक्त बाइंडिंगपुरते आहे.
  • मिश्रण जितके अधिक मळले जाईल तितके गुलाबजाम अधिक हलके होतात. गोळे बनवताना पृष्ठभाग अगदी मऊ व्हायला पाहिजे. चिरा पडल्या तर गुलाबजाम चांगले होत नाहीत.   

Web title- sweet potato fasting gulabjamun recipe in Marathi   


अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणूनच अन्नाविषयी सर्व काही मजकूर आम्ही या सेक्शनमध्ये प्रसिद्ध करणार आहोत. त्यामध्ये नामवंत शेफपासून ते सर्वसामान्यांनी बनवलेल्या विविध पाककृतींची साग्रसंगीत माहिती आम्ही देणार आहोत. तसेच केवळ पाककृतीच नव्हे तर वेगवेगळ्या प्रांतामधील खवय्येगिरीचीही आम्ही झलक घडवणार आहोत.

0 Response(s) to “उपवासाचे झटपट गुलाबजाम”

Leave a reply