news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

नवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर

Navratri Special Fasting Food- Sweet Potato (Shakarkand Kheer) Navratri Special Fasting Food- Sweet Potato (Shakarkand Kheer)

नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. उपवासाला चालतील अशा काही पाककृती जाणून घेऊया गुड फूड या सदरात.

रताळ्याची खीर

साहित्य

रताळ्याचा कीस १ मोठी वाटी
साखर त्याच्या पाऊणपट
दूध पाऊण लिटर
ओले खोबरे पाव वाटी
वेलचीपूड अर्धा चमचा
बदामाचे पातळ काप सजावटीसाठी

हेही वाचा- उत्सव नवरात्रीचा : उत्साह नवरंगांचा; जाणून घ्या नवरंगांचं महत्त्व

कृती

रताळे अगदी बारीक किसणीने किसून घ्यावे. दूध उकळत ठेवावे. त्यातच रताळ्याचा कीस घालावा. दूध अधूनमधून ढवळत आटू द्यावे. रताळ्याचा कीस चांगला शिजला की त्यात साखर, खोबरे आणि वेलचीपूड घालून चांगले एकजीव करून घ्यावे. वरून बदामाचे काप पसरून रताळ्याची खीर वाढावी.

Web Title- Navaratri Fasting special- Shakkarkand Kheer Sweet Potato Pudding recipe 


अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणूनच अन्नाविषयी सर्व काही मजकूर आम्ही या सेक्शनमध्ये प्रसिद्ध करणार आहोत. त्यामध्ये नामवंत शेफपासून ते सर्वसामान्यांनी बनवलेल्या विविध पाककृतींची साग्रसंगीत माहिती आम्ही देणार आहोत. तसेच केवळ पाककृतीच नव्हे तर वेगवेगळ्या प्रांतामधील खवय्येगिरीचीही आम्ही झलक घडवणार आहोत.

0 Response(s) to “नवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर”

Leave a reply