news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

लवकरच 'सॅमसंग'च्या फोल्डेबल फोनची नोंदणीची सुरुवात

Samsung's Foldable Phone Registration Begins Soon Samsung's Foldable Phone Registration Begins Soon

 

लवकरच 'सॅमसंग'च्या पहिल्या स्मार्ट गॅलेक्सी फोल्डेबल फोनची ऑनलाईन बुकींग सुरू होणार आहे. ही नोंदणी ११ ऑक्टोबरपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून करण्यात येईल. याआधी ४ ऑक्टोबर रोजी सॅमसंगच्या याच फोनची आगाऊ नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी फक्त अर्ध्या तासात एक हजार सहाशे फोनची विक्री झाली होती. त्यानंतर आता पुन्हा ११ तारखेला ही नोंदणी करता येणार आहे. २० ऑक्टोबरपासून हा फोन ग्राहकांना घरपोच मिळणार आहे.

(हे ही वाचा - सॅमसंगचा ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा !)

किंमत आणि नोंदणीची वेळ

या फोनसाठी आगाऊ नोंदणी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच १ लाख ६४ हजार ९९९ रुपये खरेदीदारांना पूर्ण रक्कम द्यावी लागणार आहे.

(हे ही वाचा - 'सॅमसंग'तर्फे शुक्रवारपासून ५-जी स्मार्टफोनचे पर्व सुरू)

फोनचे वैशिष्ट्य

हा फोन घरपोच मिळणार असून या फोनचा अपघात विमाही देण्यात येणार आहे. फ्रंट डिस्प्ले ४.६ इंचाचा आहे. तीन कॅमेरे असलेल्या या फोनमध्ये १६ मेगापिक्सल प्रायमरी आणि १२ मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर आहे.

 

Web title – Samsung's Foldable Phone Registration Begins Soon

0 Response(s) to “लवकरच 'सॅमसंग'च्या फोल्डेबल फोनची नोंदणीची सुरुवात ”

Leave a reply