news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे

Maharashtra's prime temples of goddess Durga called Sade Teen Shakti Peeth symbolize immense female power Maharashtra's prime temples of goddess Durga called Sade Teen Shakti Peeth symbolize immense female power


महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे

आदिशक्तीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन मुख्य पीठे आहेत. यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंद्र मानतात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंद्रांचा ज्यात समावेश केला जातो अशी एकूण ५१ शक्तिपीठे संपूर्ण भारतात आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत.

नवरात्रीच्या नऊ दिवसात या ठिकाणी लाखो भक्तगण भेट देतात, आदिमायेची श्रद्धेने उपासना करतात. याशिवाय पुराणात आढळून येणारे उल्लेख, मंदिराची वैशिट्यपूर्ण बांधणी, रेखीव आणि तेजोमय मूर्ती या आणि अश्या अनेक गोष्टींमुळे या शक्तिपीठांची ख्याती संपूर्ण देशात पसरली आहे. स्त्रीच्या ठायी असलेल्या विराट वैश्विक शक्तीचे प्रतीक असलेल्या साडेतीन शक्तिपीठांची थोडक्यात ओळख.

(हेही वाचा - शंभराव्या नाट्यसंमेलनासाठी डॉ. जब्बार पटेल, मोहन जोशी यांच्यात चुरस)

पहिले शक्तिपीठ - अंबाबाई, कोल्हापूर

Ambabai (Kolhapur)

Ambabai (Kolhapur)

शिलाहारपूर्व काळापासून अस्तित्वात असलेले श्री देवी अंबाबाईचे मंदिर सिंदवंशी राजाने बांधले असावे असे संशोधकांचे मत आहे. तर काही संशोधकांच्या मते सातव्या शतकात चालुक्य राजवटीत या मंदिराच्या बांधकामाचा उल्लेख आढळतो. आताच्या मंदिराच्या भागांपैकी जो सर्वात जुना भाग आहे त्याचे बांधकाम चालुक्य काळात झाले असावे. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या देवस्थानाचा उल्लेख पुराणे, जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यात आढळून येतो. मंदिराचे बांधकाम काळ्या दगडात केलेले असून मुख्य वास्तूत दोन मजले आहेत. देवळाचे शिखर आणि घुमट शंकराचार्य यांनी बांधले असा उल्लेख आढळतो. हेमाडपंती स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेलया या मंदिराची बांधणी एकावर एक ठेवलेल्या चौकोनी दगडात केलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आली आहे की, वर्षातून दोन दिवशी सूर्यकिरणे देवीच्या थेट अंगावर पडतात. ही किरणे सर्वप्रथम अंबाबाईच्या पायावर पोहोचतात व तेथून हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. निसर्ग आणि आदिशक्तीचा हा अद्भुत मिलाप पाहण्यासाठी कार्तिक आणि माघ महिन्यात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या उत्सवाला किरणोत्सव म्हणण्यात येते. करवीरवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात इथे मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. याशिवाय वर्षभर इथे महाराष्ट्रभरातल्या भक्तांचा ओघ सुरूच असतो.

कसे जावे- कोल्हापूर बस स्थानकापासून इथे जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय होऊ शकते. मुंबई, पुण्याहून महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या तसेच इतर खाजगी गाड्या दररोज कोल्हापूरला जात असतात.

(हेही वाचा - सेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य)

दुसरे शक्तिपीठ - श्री रेणुकामाता - माहूरगड

Renuka Devi, Mahurgad (Nanded)

Renuka Devi, Mahurgad (Nanded)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे इतिहासकारांचे मत आहे. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. आईचा वियोग सहन न होऊन परशुरामांनी गुरुदत्तांना साकडे घातले. दत्तगुरु प्रकट झाले व म्हणाले, आईला कळवळून हाक मार, मग ती जमिनीतून वर येईल, मात्र पूर्णरूपाने वर येईपर्यंत महिना लागेल तोपर्यंत आईचे स्मरण करायचे नाही. विस्मरणाचा प्रयत्न करूनही तेराव्या दिवशी स्मरण झाले तोपर्यंत ती गळ्यापर्यंत वर आलेली होती. याच स्वरूपात गळ्यापर्यंत रेणुका मातेची मूर्ती दिसते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. यादवांच्या काळापासून म्हणजे सुमारे ७०० वर्षांपासून हे स्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

कसे जावे- मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद तसेच बंगळूर येथून नांदेडला रेल्वेने थेट जाता येते. माहूरपर्यंत - नांदेड ते माहूर अशी एस्‌‍टीची बससेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालविते. हा प्रवास सुमारे तीन तासाचा आहे. माहूर गाव ते टेकडीवरील मंदिर - शहरातून टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या धावतात. त्याऐवजी काही खाजगी सेवादेखील मिळतात.

(हेही वाचा - प्लास्टिक, थर्माकोलवर बंदी होणार लागू, जाणून घ्या काय असणार यात!)

तिसरे शक्तीपीठ - श्री तुळजाभवानी - तुळजापूर

Tuljabhavani Devi, Tuljapur (Osmanabad)

Tuljabhavani Devi, Tuljapur (Osmanabad)

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.आई तुळजा भवानी महाराष्ट्रातल्या क्षात्रतेजाची स्फूर्तीदेवता असून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता आहे. मोहिमेवर जाण्यापूर्वी महाराज तुळजाभवानीचे दर्शन घेत असत असा उल्लेख कागदोपत्रात आढळतो. हे स्थान जागृत असून संकटाला धावून येणाऱ्या भवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. इतिहास अभ्यासकांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकाळात बांधले गेले असावे. पुराण कथांमध्येही या देवीच्या अवतार कथा वाचण्यास मिळतात. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेतायुगात - श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. जगभरातून विविध भागातून भाविक हिच्या दर्शनासाठी येत असतात.
तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून दक्षिणेकडे परमार दरवाजा असून सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृहात चांदीच्या सिंहासनात श्री तुळजाभवानीची रेखीव मूर्ती वसली आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची मूर्ती गंडकी शिळेपासून तयार करण्यात आली असून तिची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आहे. वर्षातून तीन वेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे असून सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे. या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.

कसे जावे- हे तीर्थक्षेत्र उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद-तुळजापूर अंतर १९ किमी आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणांहून तुळजापूरला येण्यासाठी थेट बसची सोय आहे. याशिवाय पश्चिम रेल्वे मार्गावरील उस्मानाबाद किंवा सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत जिथून देवस्थानापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय होऊ शकते.

(हेही वाचा - जेटली यांच्या कुटुंबियांचा पेन्शन घेण्यास नकार; उपराष्ट्रपतींना लिहिलं पत्र)

अर्ध शक्तिपीठ - सप्तशृंगीदेवी - वणी

Saptashrungi Devi, Vani (Nashik)

Saptashrungi Devi, Vani (Nashik)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे रूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे. देवीची मूर्ती स्वयंभू असून देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. मंदिराच्या गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. या मंदिराच्या आवारात सह्याद्रीच्या उंच कड्यात सात शिखरे आहेत त्यावरूनच या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदुराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे. सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते.

कसे जावे - नाशिकपासून सुमारे ६५ किमी अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येत असतात. मुंबई पुण्याहून इथे जाण्यासाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसची तसेच खाजगी वाहनांची व्यवस्था आहे.

 

Web Title - Maharashtra's prime temples of goddess Durga called Sade Teen Shakti Peeth symbolize immense female power 

0 Response(s) to “श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे”

Leave a reply