news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

रणवीरने माझा गॉगल का घातलाय ? धोनीच्या लेकीचा प्रश्न

ms dhoni shares hilarious post after ziva dhoni gets shocked watching ranveer singh wearing same glasses as her  ms dhoni shares hilarious post after ziva dhoni gets shocked watching ranveer singh wearing same glasses as her

 

लहान मुलं कधी काय बोलतील आणि करतील, याचा काहीच भरोसा नसतो. असाच एक मजेशीर किस्सा भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीसोबत घडला आहे. जीवाने विचारलेल्या प्रश्नाने तो थक्क झाला आणि त्याने हा किस्सा सोशल मीडियावरुन सगळ्यांसोबत एका फोटोसह शेअर केला.

हेही वाचा - 'शरद पवारांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार'

धोनीने शेअर केलेल्या फोटोत जीवाने रणवीर सिंह सारखाच गॉगल घातलेला दिसतो आहे. यासोबत धोनीने लिहिले की, जीवाला असे वाटले की रणवीरने तिचा गॉगल का घातला. म्हणून तिने तिचा गॉगल शोधला आणि शेवटी म्हणाली, "माझा गॉगल तर माझ्याकडेच आहे." 'आत्ताची मुले वेगळी आहेत, साडेचार वर्षांचा असताना मला हे कळालंही नसतं की, माझा गॉगल कोणासारखा तरी आहे. मला खात्री आहे पुढच्या वेळी जेव्हा ती रणवीरला भेटेल, तेव्हा ती त्याला म्हणेल तुझ्यासारखाच गॉगल माझ्याकडेही आहे.

 

धोनीच्या या पोस्टवर रणवीरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ''हाहाहाहा, फॅशनिस्टा Z''

 

दरम्यान, नुकताच झालेल्या एले ब्युटी अवॉर्डसमध्ये रणवीरने काळा कोट, काळी टोपी आणि स्टाइलिश गॉगल घातला होता. त्यांचा हाच फोटो बघून रणवीरनं तो गॉगल जीवाच्या स्टाईलमधून प्रेरणा घेऊन घातल्याचा दावा धोनीच्या मुलीनं केला आहे.

 

Web title - ms dhoni shares hilarious post after ziva dhoni gets shocked watching ranveer singh wearing same glasses as her


चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज यांचं आकर्षण नाही, असं सांगणारी व्यक्ती आता शोधूनही सापडणार नाही. आपलं बॉलिवुड तर आता प्रत्येकाच्या घराघरातच पोचलं आहे. या बॉलिवुडची बित्तंबातमी, लेख, मुलाखती, गॉसिप्स आदींचा भरगच्च मजकूर या विभागात प्रसिद्ध होणार आहे. कलावंतांच्या खासगी जीवनाबद्दल सर्वसामान्यांना प्रचंड कुतूहल असतं. हे कलाकार काय खातात, कुठं हॉटेलिंगला जातात, जिममध्ये हे कोणते व्यायामप्रकार करतात यापासून त्या मंडळींच्या लिंकअप्सची खुसखुशीत माहितीदेखील आम्ही या सेक्शनमध्ये देणार आहोत. नवीन चित्रपटांबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. म्हणूनच आमच्याकडची समीक्षकांची टीम प्रत्येक नवीन हिंदी-मराठी चित्रपटाचं रसग्रहण करणार आहेत. तसेच केवळ समीक्षकांच्या मतांवरच आपल्या वाचकांनी विसंबून राहू नये यासाठी आम्ही सध्या पब्लिक रिव्ह्यूदेखील प्रसिद्ध करीत आहोत. जेणेकरून वाचकांना एखादा चित्रपट आपण पाहावा की नाही, याचा निर्णय़ घेणे सोपे होणार आहे.

0 Response(s) to “रणवीरने माझा गॉगल का घातलाय ? धोनीच्या लेकीचा प्रश्न”

Leave a reply