news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

लेखिकेच्या भूमिकेत मधुरा वेलणकर, दसऱ्याला पुस्तकाचं प्रकाशन

Actress Madhura Velankar turned writer Actress Madhura Velankar turned writer

अभिनेत्री मधुरा वेलणकर लवकरच लेखिका म्हणून वाचक आणि तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘मधुरवं’ असे तिच्या पुस्तकाचे नाव आहे. येत्या आठ ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याला या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. या पुस्तकातील काही प्रकरणांचे वाचन श्रेया बुगडे आणि अनिता दाते करणार आहेत. तर, पुष्कर श्रोत्री प्रकाशन सोहळ्याची सगळी सूत्रे हाताळणार आहे. ‘रसिका आन्तरभारती’ या प्रकाशनाचे हे पुस्तक आहे. एका साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या लेखांचं हे संकलन आहे.

(हे ही वाचा- पुण्यात ११ ते १५ डिसेंबर दरम्यान ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’)

मधुराला इतर अनेक पुरस्कारांसह राज्य सरकारचे चार पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 'नॉट ऑन्ली मिसेस राऊत', 'अधांतरी', खबरदार, मातीच्या चुली इत्यादी चित्रपट केले आहेत. तर, चक्रव्यूह , मृण्मयी, सांजसावल्या इत्यादी मालिका आणि अनेक नाटकं गाजली आहेत. लेखिकेच्या भूमिकेत येणारी मधुरा कशी असेल हा वाचकांच्या कुतुहलाचा विषय आहे. 

 (हे ही वाचा - गांधी जयंती : मोठ्या पडद्यावर 'या' कलाकारांनी साकारली बापूंची भूमिका)

Web title- Actress Madhura Velankar turned writer


चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज यांचं आकर्षण नाही, असं सांगणारी व्यक्ती आता शोधूनही सापडणार नाही. आपलं बॉलिवुड तर आता प्रत्येकाच्या घराघरातच पोचलं आहे. या बॉलिवुडची बित्तंबातमी, लेख, मुलाखती, गॉसिप्स आदींचा भरगच्च मजकूर या विभागात प्रसिद्ध होणार आहे. कलावंतांच्या खासगी जीवनाबद्दल सर्वसामान्यांना प्रचंड कुतूहल असतं. हे कलाकार काय खातात, कुठं हॉटेलिंगला जातात, जिममध्ये हे कोणते व्यायामप्रकार करतात यापासून त्या मंडळींच्या लिंकअप्सची खुसखुशीत माहितीदेखील आम्ही या सेक्शनमध्ये देणार आहोत. नवीन चित्रपटांबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. म्हणूनच आमच्याकडची समीक्षकांची टीम प्रत्येक नवीन हिंदी-मराठी चित्रपटाचं रसग्रहण करणार आहेत. तसेच केवळ समीक्षकांच्या मतांवरच आपल्या वाचकांनी विसंबून राहू नये यासाठी आम्ही सध्या पब्लिक रिव्ह्यूदेखील प्रसिद्ध करीत आहोत. जेणेकरून वाचकांना एखादा चित्रपट आपण पाहावा की नाही, याचा निर्णय़ घेणे सोपे होणार आहे.

0 Response(s) to “लेखिकेच्या भूमिकेत मधुरा वेलणकर, दसऱ्याला पुस्तकाचं प्रकाशन”

Leave a reply