news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

पिळगांवकरांची सन्मानचिन्हे परत मिळण्याची आशा धूसर

less chances to recover the stolen trophies of actor Sachin Pilgaonkar less chances to recover the stolen trophies of actor Sachin Pilgaonkar

 

अभिनेते सचिन पिळगांवकर व त्यांच्या वडिलांची चोरीला गेलेली तब्बल १२ सन्मानचिन्हे पुन्हा मिळण्याची आशा आता धूसर झाली आहे. मौल्यवान अशी ही सन्मानचिन्हं त्यांच्या विश्वासू नोकराने कवडीमोल भावात भंगार विक्रेत्याला विकली होती. त्या भंगार विक्रेत्याचा थांगपत्ता पोलिसांना लागला आहे. मात्र सन्मानचिन्हे परत मिळतील, याची काहीही शाश्वती नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

सन्मानचिन्हांची लावली व्हिलेवाट

हा प्रकार मागील आठवड्यात सचिन आणि पत्नी सुप्रिया यांच्या लक्षात आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नोकर अमृत याला अटक करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी सन्मानचिन्हे विकत घेणाऱ्या भंगार विक्रेत्यांना शोधून काढले आहे. मात्र ही सन्मानचिन्हे विकताना अमृतने त्याच्यावरील नावे काढून टाकल्यामुळे ती नेमकी कुणाची आहेत, हे कळलं नाही व आम्ही ती विकत घेतली होती, असं भंगार विक्रेत्याने सांगितले. सन्मानचिन्हांवरील धातू वेगळे करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे भंगार विक्रेत्यांनी पोलिसांना सांगितले. आता ती सन्मानचिन्हे मिळण्याची शक्यतादेखील नसल्याचे भंगार विक्रेत्याचे म्हणणे आहे.

(हेही वाचा...७४ वर्षांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बाॅम्ब निकामी करताना स्फोट, दोघे ठार)

दरम्यान, सन्मानचिन्हे चोरीला गेल्याने अभिनेते सचिन पिळगांवकर निराश झाले आहेत. वडिलांनी त्यांच्या कारकिर्दीत मिळवलेली सन्मानचिन्हे वडिलांच्या पश्चात आपण सांभाळू शकलो नाही, याचे फार दुःख त्यांना झाले आहे. नोकरासाठी ही सन्मानचिन्हे कवडीमोल होती, मात्र सचिन यांच्यासाठी ती त्यांच्या संपत्तीपेक्षाही मौल्यवान होती, असे चित्रपटसृष्टीतील त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

अभिनेते सचिन पिळगांवकर यांचं जुहू तारा रोड येथील एका अपार्टमेंटमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयात त्यांनी वडिलांची व लहानपणी स्वतःला मिळालेली सन्मानचिन्हे एक आठवण म्हणून जतन करून ठेवली होती. मात्र मागील वर्षभरात पिळगांवकर यांचा विश्वासू नोकर अमृत सोळंकी याने एक एक करून अशी १२ सन्मानचिन्हे भंगार विक्रेत्यांना कवडीमोल भावात विकली.

अमृत हा गेली १६ वर्षे पिळगावकर यांचे कार्यालय सांभाळत होता. सचिन आणि सुप्रिया या दोघांनीही नोकर अमृत याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे अमृतवर संशय बळावला होता. त्यानंतर सचिन यांनी याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी नोकर अमृत सोळंकी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सन्मानचिन्हे जुहू येथील दोन भंगार विक्रेत्यांना विकल्याची कबुली दिली आहे.

 (हेही वाचा...'मी दीपाली... मीच सोफिया...' कळवा-मुंब्य्रात सेनेचा डबलनेमगेम)

web title : less chances to recover the stolen trophies of actor Sachin Pilgaonkar 

 

0 Response(s) to “पिळगांवकरांची सन्मानचिन्हे परत मिळण्याची आशा धूसर”

Leave a reply