news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

राजभवनात राज्य राखीव दलाच्या जवानाने झाडली स्वतःवर गोळी

SRPF jawan shoots himself at Rajbhavan Mumbai SRPF jawan shoots himself at Rajbhavan Mumbai

 

राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीररीत्या जखमी झालेल्या जवानाला उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

जवानाची प्रकृती चिंताजनक

दीपक चव्हाण (२८)असे राज्य राखीव दलाच्या जवानाचे नाव आहे. दीपक हा राज्य राखीव दलाच्या १६ कोल्हापूर तुकडीतील जवान आहे. दीपक चव्हाण हे राजभवन येथे तैनात होते. सोमवारी सायंकाळी राजभवनात असलेल्या सर्व्हन्ट कॉटरच्या एका खोलीत गोळी झाडण्याचा आवाज येताच तेथे तैनात पोलिसांनी खोलीकडे धाव घेतली. खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवान दीपक चव्हाणला सहकाऱ्यांनी ताबडतोब उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

कौटुंबिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न?

दीपकच्या तोंडातून गेलेली पिस्तुलची गोळी डोक्यात बाहेर निघाली आहे. दीपकची प्रकृती चिंताजनक असून त्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता प्राथमिक तपासावरून समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मलबार हिल पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.

Web title : Raj bhuvan shot himself srpf jawan

0 Response(s) to “राजभवनात राज्य राखीव दलाच्या जवानाने झाडली स्वतःवर गोळी”

Leave a reply